जेएनएन, जालना: राज्यात नाफेडच्या (NAFED) माध्यमांतून सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे. नाफेडकडून खरेदीसाठी नियुक्त केलेले खासगी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. सोयाबीनला गाळणी आणि हमालीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 140 रुपये प्रती क्विंटल अशी वसूली केली जात आहे, असा आरोप काही शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता.

संबंधित केंद्राची चौकशी केली जाईल 

यानंतर, नाफेडकडून खरेदीसाठी नियुक्त केलेले खासगी खरेदी सोयाबीन केंद्रावर (NAFED Soyabeen Center) शेतकरीची लूट थांबविण्याचे निर्देश दिले आहेत, अशी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाल यांनी दिले आहे. तसंच, संबंधित केंद्राची चौकशी केली जाईल अशी माहिती पांचाल यांनी दिली आहे.

कारवाईचे निर्देश

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन खरेदी सुरू होताच शेतकरीची अडचण होणार नाही आणि पिळवणूक होणार नाही, याची खबरदारी म्हणून आदीच कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या अजून काही तक्रारी असतील त्याची पाहणी करून उचित कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

    काय आहे प्रकरण

    जालना जिल्हातील जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी ढोकसाळ सेंटर तालुका मंठा यांच्या संचालिका सीमा दत्तात्रय अवचर द्वारा संचालित नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून गाळणी आणि हमालीच्या नावाखाली 140 रुपये प्रती क्विंटलची वसूली केली जात आहे. असा आरोप करत वसुलीची तक्रार शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. 

    अनेक शेतकऱ्यांकडून पावती न देता घेतले पैसे

    नाफेड खरेदी केंद्राची 140 रुपयाची वसूली तत्काळ थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सोयाबीन खरेदी दरम्यान जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सहायक दिगंबर अवचर यांनी अनेक शेतकऱ्यांकडून पावती न देता फोन पे नंबरवर पैसे घेतले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. संचालिका सीमा दत्तात्रय अवचर यांच्याशी फोनवर संपर्क साधले असतांना सहायक दिगंबर अवचर यांनीच संवाद साधला आहे.

    कडक कारवाई केली जाईल - पणनमंत्री 

    राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मराठी जागरणला सोयाबीन खरेदीमध्ये शेतकरीकडून कुठेलही पैसे नाफेडकडून आकरले जात नाही. जर कोणी नाफेड खरेदी केंद्रावर असे पैसे आकारले जात असतील तर त्या संस्थेचा परवाना रद्द करून ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल. जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची चौकशी करून कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

    काय म्हणाले कंपनीचे सहायक 

    जय जिवाजी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सहायक दिगंबर अवचर यांच्याशी मराठी जागरण यांनी फोनवर संपर्क केला. अवचर यांना शेतकऱ्यांकडून 140 रुपये वसूल केले जात आहे अशी तक्रार असल्याचे विचारले असता, त्यांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. व मुळ प्रश्नाला उत्तर दिले नाही.