Sukanya Samriddhi Scheme : जर तुमच्या घरात लहान मुलगी असेल तर तुम्ही तिच्या शिक्षण आणि विवाहाच्या वेळी एकरकमी आर्थिक मदत मिळवण्यासाठी केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. 10 वर्षाहून कमी वयाच्या मुलीच्या उच्च शिक्षण व विवाहासाठी बचत करण्याच्या उद्देश्याने केंद्र सरकारची सुकन्या समृद्धि योजना एक चांगली गुंतवणूक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला इनकम टॅक्समध्येही सवलत मिळते. त्याचबरोबर जे लोक शेअर बाजाराच्या जोखमीपासून दूर राहणार असतील व फिक्स्ड डिपॉजिट (एफडी) मध्ये घटत्या व्याज दराने त्रस्त असतील त्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना चांगला पर्याय ठरू शकते.( Government Schemes)

ही योजना केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ अभियानाच्या अंतर्गत 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेचा उद्देश्य, आई-वडिलांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी व पालनपोषणासाठी बचतीसाठी प्रोत्साहित करणे आहे. यामध्ये इन्वेस्ट करण्यात आलेला पैसा सुरक्षित राहतो. यावर निश्चितपणे रिटर्न मिळतो. याचा इंटरेस्ट 100 टक्के टैक्स-फ्री असतो आणि इनकम टॅक्स अक्टच्या सेक्शन 80C नुसार यावर टॅक्स डिडक्शन बेनिफिट सुद्धा मिळतो.

सुकन्या समृद्धी योजना (SSY) काय आहे?

ही एक सरकार-समर्थित स्मॉल सेविंग्स स्कीम आहे, जी पोस्ट ऑफिस किंवा सरकारी आणि प्रायव्हेट बँकेत ओपन केली जाते. जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षे किंवा त्याहून कमी आहे तर तुम्ही तिच्या नावाने एक SSY अकाउंट खोलू शकता. एकहून अधिक मुली असल्यास अधिकाधिक दोन खाती व एक मुलगी असल्यास केवळ एक अकाउंट सुरु केले जाऊ शकते. हे अकाउंट मुलीच्या 21 वर्षानंतर किंवा मुलीच्या लग्नावेळी मॅच्योर होते. एसएसवाय योजनेत 7.6 टक्के दराने व्याज दिले जाते. ज्यावर इनकम टॅक्स सवलतही दिली जाते. यापूर्वी या योजनेत 9.2 टक्के पर्यंत करमुक्त व्याज मिळत होते. 

गुंतवणुकीचा कालावधी व गुंतवणुकीची रक्कम -

या स्कीममध्ये अकाउंट ओपन केल्यापासूनच्या तारखेपासून अधिकाधिक २१ वर्षांचा लॉक-इन पीरियड असतो. याचा अर्थ तुम्ही आता आपल्या ९ वर्षाच्या मुलीसाठी SSY अकाउंटमध्ये गुंतवणूक करणे सुरू करता तर हे खाते २१ वर्षानंतर म्हणजे मुलगी 30 वर्षाची झाल्यानंतर मॅच्योर होईल. मात्र जर मुलीचे या दरम्यान लग्न झाले तर लग्नानंतर हे खाते सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही. सध्या तुम्ही एका आर्थिक वर्षात या अकाउंटमध्ये कमीत कमी २५० रु. आणि अधिकाधिक १.५ लाख रु. इन्वेस्ट करू शकता. या याजनेमध्ये तुम्हाला १५ वर्षापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर त्यावर 6 वर्षापर्यंत व्याज मिळेल.

    SSY मध्ये का करावी गुंतवणूक?

    फिक्स्ड इन्कम सेगमेंट मध्ये अधिक रिटर्न आणि टॅक्स बेनिफिट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आई-वडिलांसाठी हा एक आकर्षक पर्याय आहे. या योजनेत आपल्या मुलांच्या शिक्षणाबरोबरच विवाहासारख्या आवश्यक गरजांसाठी पैसे जमा करण्यास मदत मिळते. या स्कीमचा इन्वेस्टमेंट पीरियड २१ वर्षे आहे, हे लक्षात घेऊन तुम्हाला इन्वेस्टमेंट करावी लागेल जेणेकरून मुलीच्या गरजेच्या वेळी वेळेवर पैसे मिळू शकतील. जर तुम्ही आपल्या ५ वर्षाच्या मुलीसाठी या योजनेत इन्वेस्ट करण्यास सुरुवात करत असाल तर मुलीच्या २६ व्या वर्षी मॅच्योरिटी मिळेल. त्यावेळीपर्यंत मुलीचे उच्च शिक्षण पूर्ण झालेले असेल. २१ वर्षाच्या आधीच्या केवळ शिक्षणासाठी व विवाहासारख्या विशेष परिस्थितीमध्ये योजनेतून पैसे काढण्याची परवानगी आहे.

    सुकन्या समृद्धी योजनेत खाते कसे सुरु करावे?

    सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत एकाउंट कोणत्याही मुलीच्या जन्मानंतर १० वर्षाच्या आत कमीत कमी २५० रुपयेजमा करून खाते ओपन करून शकता. चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक १.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.

    कोठे ओपन करणार सुकन्या समृद्धी योजना खाते?

    सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत अकाउंट कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल बँकेच्या अधिकृत शाखेत खोलले जाऊ शकते.

    सुकन्या समृद्धी योजना खाते ओपन करण्याचे नियम -

    सुकन्या समृद्धी योजना खाते मुलीचे आई-वडिल किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने तिच्या १० वर्षे वयाच्या आत शुरु करू शकतात. या नियमानुसार एका मुलीसाठी केवळ एकच खाते सुरु केले जाऊ शकते आणि त्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात. एकी मुलीसाठी दोन खाते सुरू करता येत नाहीत.

    सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा न झाल्यास काय होते?

    अनियमित सुकन्या समृद्धी योजना अकाउंटमध्ये कमीत कमी रक्कम जमा झाली नसल्यास ५० रुपये वार्षिक पेनाल्टी भरून हे खाते नियमित केले जाऊ शकते. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी भरण्यात येणारी कमीत कमी रक्कमही सुकन्या समृद्धी योजना अकाउंटमध्ये भरावी लागेल. जर दंड भरला नाही तर सुकन्या समृद्धी योजना खात्यात जमा रक्कमेवर पोस्ट ऑफिसच्या सेविंग अकाउंट इतके व्याज मिळेल जे आता सुमारे चार टक्के आहे. जर सुकन्या समृद्धी योजना खात्यात व्याज अधिक भरले असेल तर ते खाते रिवाइज केले जाऊ शकते.

    योजनेंतर्गत मुलीचे बँक खाते उघडल्यापासून ती मुलगी १४ वर्षाची होईपर्यंत तिच्या पालकांना तिच्या बँक खात्यात निश्चित अशी रक्कम जमा करावी लागेल. यानंतर मुलीचे वय १८ वर्षानंतर या जमा रकमेपैकी ५०% रक्कम पालक तिच्या शिक्षण खर्चासाठी काढू शकतात. मुलगी २१ वर्षाची झाल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढली जाऊ शकते. अशी हि केंद्र सरकारची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे. 

    योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -–

    • आधार कार्ड
    • मुलगी जन्म प्रमाणपत्र
    • पासपोर्ट आकाराचा फोटो
    • पालकांचे ओळखपत्र
    • पत्ता पुरावा
    • मोबाइल नंबर

    योजनेसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

    • सर्वप्रथम आपल्याला आपली सर्व कागदपत्रे जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये घ्यावी लागतील.
    • यानंतर या योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला त्याच्याकडून अर्ज घ्यावा लागेल.
    • अर्ज  घेतल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती त्या अर्जामध्ये भरावी लागेल.
    • सर्व माहिती भरल्यानंतर सर्व कागदपत्रे अर्जासह जोडून ती बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतील.