नवी दिल्ली - Maharashtra Government Schemes : राज्य सरकार गर्भवती महिलांसाठी अनेक योजना चालवत असते. त्यापैकीच एक आहे बेबी केअर कीट योजना (Baby Care Kit Scheme). महाराष्ट्र सरकारच्या वतीने 26 जानेवारी 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेनुसार लाभार्थ्यांना शासकीय रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्यय केंद्रामध्ये पहिल्या प्रसूतीवेळी जन्माला येणाऱ्या नवजात बाळाला 2 हजार रुपये किमतीचे बाळाच्या उपयोगातील “बेबी केअर किट” चा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ सरकारी रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नोंदणी केलेल्या किंवा प्रसूतीनंतर दोन महिन्याच्या आत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे. या बेबी केअर कीटमध्ये नवजात बालकाचे कपडे, टॉवेल, मच्छरदाणी, अंगाला लावायला तेल, ब्लँकेट, प्लॅस्टीक चटई, शाम्पू, नेलकटर, खेळणी , हातमोजे, पायमोजे, आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड, बॉडीवॉश लिक्विड, लहान गादी इ. प्रकारचे साहित्य व हे साहित्य ठेवण्यासाठी एक बॅग मिळणार आहे.
हे ही वाचा - Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी बंद? लाभापासून वंचित महिलांनी आता काय करायचं..
कसा घेणार योजनेचा लाभ -
बेबी केअर कीट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रसूतीनंतर दोन महिन्यांच्या आत अर्ज करावा लागणार आहे.यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घ्यानी लागणार आहे.
योजनेचा अर्ज https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या वेबसाईटवरही उपलब्ध असून तो तेथूनही डाउनलोड करता येणार आहे. या योजनेत नवजात शिशुंच्या मातांना शिशु देखभाल किट प्रदान केले जाईल. महिलांची प्रसूती अधिकाधिक प्रमाणात रुग्णालयात करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देश्याने ही योजना सुरू केली आहे. या योजनेत नवजात बाळाला आईचे दूध व योग्य पोषण देण्यास प्राधान्य दिले जाते. याच्या माध्यमातून राज्यातील शिशू मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बेबी केयर किटमध्ये काय-काय मिळणार -
जवळपास दोन हजार रुपये किंमतीचे सामान या किटमधून मिळणार आहे. त्यात - नवजात बाळाचे कपडे, एक छोटी गादी,टॉवेल, डायपर, शरीर मालिश तेल, थर्मामीटर, मच्छरदाणी, ब्लँकेट,शॅम्पू, नेलकटर, हातमोजे, पायमोजे, बॉडीवॉश लिक्विड, हँड सॅनिटायझर, आईसाठी गरम कपडे, छोटी खेळणी.
बेबी केअर किट योजनेसाठी नोंदणीकरण प्रक्रिया -
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात व सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या बालकांना संबंधित रुग्णालयात बेबी केअर किट मिळेल. जेथे मुलाचा जन्म होतो, त्या आरोग्य केंद्रातच बेबी केअर कीट देण्याची व्यवस्था आहे. याशिवाय आतापर्यंत दुसरी कोणतीही ऑफलाइन किंवा ऑनलाइन नोंदणीकरण प्रक्रिया उपलब्ध नाही. यासाठी अंगणवाडी सेविकांचीही मदत घेतली जाऊ शकते. अधिक माहितीसाठी सरकारची अधिकृत वेबसाइट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en वर भेट देऊ शकता.