Aadhaar Card Update : आधार कार्ड (Aadhaar Card) हे सध्या सर्व आवश्यक सुविधांसाठी एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. सरकारी योजनेच्या सुविधा मिळणे किंवा रेल्वे तिकीट बुक करणे तसेच शाळा-महाविद्यालयीन प्रवेशाच्या कामांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. आधारशी संबंधित सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डमध्ये वापरात असलेला मोबाइल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे.
आधार कार्डचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यातील फोन नंबर बरोबर असणे आहे. जर आधार कार्ड बनवताना मोबाइल नंबर तुम्ही जर आता वापरत नसाल तर हे तुमच्यासाठी चांगले नाही. त्यामुळे आताच त्यात दुरुस्ती करून नवीन मोबाइल नंबर अपडेट करू शकता.
आधार क्रमांकाच्या (Aadhaar Number) साहाय्याने कोणतेही काम करण्यासाठी त्याच्यावरील मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर पडताळणीसाठी OTP येतो. तुमचा मोबाईल क्रमांक बदलला असेल आणि आधीचा क्रमांक बंद असेल तरीही आधार पडताळणीसाठी येणारा ओटीपी तुमच्या जुन्या क्रमांकावर जाईल. म्हणजेच, तुम्हाला ओटीपी पडताळणीसह प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. यासाठी आधार कार्डाशी जोडलेला आपला जुना मोबाईल क्रमांक बंद झाल्यास चालू असलेला क्रमांक अपडेट करणे आवश्यक ठरते.
जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये स्पेलिंग एरर, वैयक्तिक तपशील त्रुटी किंवा चुकीचा मोबाइल नंबर यासारखी कोणतीही समस्या आढळल्यास तुम्ही नवीन मोबाइल नंबर आणि इतर तपशीलांसह ते ऑनलाइन अपडेट करू शकता.
आधारमध्ये नवीन मोबाईल क्रमांक कसा अपडेट करावा -
1 - सर्वात प्रथम तुम्हाला आधार नोंदणी / अपडेट सेंटरवर जावे लागेल.
2- तेथे आधार कार्ड दुरुस्ती अर्ज भरावा लागेल.
3 - आपल्याला या फॉर्मवर अपडेट करायचा असलेला मोबाइल नंबर भरावा. त्यानंतर अर्ज आधार केंद्रावरील अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
4 - त्यानंतर तेथे आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी आपली बायोमेट्रिक्स द्यावी लागतील.
5 - बायोमेट्रिक्स दिल्यानंतर तेथील कार्यपालक तुम्हाला पावती (रीसीट) देईल.
6 - या पावतीमध्ये तुम्हाला एक विनंती क्रमांक (रिक्वेस्ट नंबर - URN) मिळेल.
7 - आपण URN वापरून आपली अपडेट स्थिती तपासू शकता. (म्हणजेच क्रमांक अपडेट झाला आहे किंवा नाही ते तपासू शकता.)
8- मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधारकार्ड घेण्याचीही गरज नाही.
9- जेव्हा आपला नवीन मोबाइल नंबर आधारवर नोंदणीकृत होईल, तेव्हा तुम्हाला त्याच बदललेल्या मोबाइल नंबरवर आधार पडताळणीसाठी ओटीपी मिळू लागेल.
10 - तुम्हाला आधारची अद्ययावत स्थिती बघायची असेल तर यूआयडीएआयच्या (UIDAI) टोल-फ्री क्रमांकावर 1947 वर कॉल करूनही तुम्ही जाणून घेऊ शकता.
कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही -
आधार कार्डावरील मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. फक्त आधार अपडेट अर्ज भरावा लागेल. यात सध्याचा चालू असलेला मोबाइल नंबर भरावा लागेल. तसेच, अपडेटसाठीचे शुल्क 50 रुपये जमा करावे लागेल.
यूआयडीएआय, आधार कार्ड धारकांना आपला फोन नंबर अपडेट करण्याची परवानगी देते. आधार कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्म तारीख सारखी पर्सनल डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार आयडीसोबत रजिस्टर्ड असायला हवा. तरच अपडेट प्रक्रियेदरम्यान त्या नंबरवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. त्यामुळे आधी खात्री करून घ्या की, तुमचा रजिस्टर्ड नंबर अॅक्टिव असायला हवा. तसेच तो तुमच्याकडे असायला हवा.
आधार नंबर अपडेट करण्याची ऑनलाईन पद्धत -
1 - आपल्या आधार कार्डवर आपला फोन नंबर अपडेट करण्यासाठी सर्वात आधी यूआडीएआय वेब पोर्टल Ask.uidai.gov.in वर जा.
2- होमपेजवर माय आधार टॅबमध्ये जाऊन Update Aadhaar या ऑप्शनवर क्लिक करा.
3- पुन्हा एकदा ड्रॉपडाउन मेन्यू पाहू शकता. त्यामध्ये Online Aadhaar services हा ऑप्शन निवडा. लिस्टमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाइल नंबर तसेच अन्य बरेच काही अन्य ऑप्शन दिसतात
4- त्यात व्हेरिफाय ईमेल, मोबाइल नंबर सिलेक्ट करा. तो फोन नंबर जोडा ज्याला तुम्हाला अपडेट करायचे आहे.
5 - तुमच्या सिस्टमवर एक नवीन टॅब उघडेल. या ठिकाणी आधार नंबर टाका. आधार संबंधित सर्व आवश्यक डिटेल्स भरा. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी टाका. ज्याला तुम्ही व्हेरिफाय करू इच्छिता.
6- तुम्हाला देण्यात आलेल्या बॉक्स मध्ये सुरक्षासाठी देण्यात आलेला एक कॅप्चा कोड टाइप करावा लागणार आहे.
7- त्यानंतर Send OTP या ऑप्शन वर क्लिक करा. तुमच्या फोन नंबरवर पाठवण्यात आलेल्या सहा अंकी ओटीपीला दिलेल्या बॉक्समध्ये प्रविष्ट करा.
8 - आता Submit OTP and Proceed या ऑप्शनवर क्लिक करा. ओटीपीला व्हेरिफाय करा. तसेच सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधारशी अपडेट होईल. याचे स्टेटस तुम्ही पाहू शकता.