जेएनएन, नवी दिल्ली. chhatrapati shivaji maharaj jayanti 2025: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्म झाला होता. या दिवसाचे निमित्त म्हणून शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी दरवर्षी जयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणून घेताना नेहमी आपल्याला शिवाजी महाराजांना छत्रपती (Chhatrapati) का म्हणतात आणि छत्रपती नावाचा अर्थ काय? असा प्रश्न आपल्या मनात येत असतो. याची माहिती घेण्यासाठी मराठी जागरण प्रतिनिधीने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्याशी संवाद साधला. 

शिवाजी महाराजांनी छत्रपती पदवी लावली

छत्रपती हे एक पद आहे. रायगडावर जेव्हा 5 जून 1874 रोजी शिवाजी महाराज यांचा राज्यअभिषेक झाला. त्यानंतर शिवाजी महाराज यांनी हे पद लावायला सुरुवात केली. ही त्या काळातील एक प्रतिष्ठित अशी पदवी आहे. 

छत्रपती शब्दाचा अर्थ काय? (What is the meaning of Chhatrapati?)

छत्राचा अधिकार असलेला छत्रपती असाही त्याचा एक अर्थ आहे. त्या काळात छत्र हे सर्वोच्च प्रतिक होते. त्याच्याकडे छत्र आहे तो सार्वभौम आहे, असा त्याच्या अर्थ होता, असं इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं. तसंच, छत्रपती या शब्दाचा एक अर्थ क्षेत्रपती असा सुद्धा आहे, याचा अर्थ भूमीचा राजा. तर, छत्रपती म्हणजे "राजा" किंवा "सम्राट" असाही त्याचा अर्थ आहे. हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे.

छत्रपती नामाचा उल्लेख

    त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःची एक बिरुदावली तयार करुन घेतली. जी त्यांच्या पत्रावर अंकीत होत होती. क्षत्रियकुलावंतस श्री राजा शिवछत्री हे शिवाजी महाराज यांचे राज्यभिषेकावेळी अधिकृत असं बिरुध धारण केलं. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याच नावाने नाणे पाडण्याची सुरुवात केली. शिवाराई होन हे सोन्याचे नाणे आणि शिवराई हे तांब्याचे नाणे पाडले. यावर एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती अशी अक्षरे कोरलेली होती. असं त्यांनी सांगितलं. क्षत्रियकुलावंतस या शब्दाचा क्षत्रिय कुलाचा मुकुटमणी असा यावेळी त्यांनी अर्थ सांगितला.

    छत्रपती पदवी लागली

    त्यानंतर ज्याप्रमाणे काळानुसार, जेही राजे महाराजांच्या गादीवर बसले. त्यांना छत्रपती ही पदवी लागत केली आणि सध्याही ही पंरपरा सुरु आहे, असंही इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी सांगिलतं.

    छत्रपती शिवाजी महाराज पुस्तकात काय?

    इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यासह आम्ही महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित आणि प्रसिद्ध लेखक प्रल्हाद नरहर देशंपाडे यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकातूनही शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कशी मिळाली, याची माहिती घेतली. पुस्तकानुसारही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावासोबत पहिल्यांना छत्रपती असा उल्लेख हा राज्यभिषेकानंतरच करण्यात आल्याचे आढळले.  

    ‘बादशाह मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला’

    छत्रपती शिवाजी महाजारांच्या राज्याभिषेकासंदर्भात पुस्तकात असे सांगण्यात आले आहे की, शिवाजी राजे झाले आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सारा भारतखंड धन्य झाला. या समारंभाचे वर्णन सभासदाने आपल्या बखरीत करुन ठेवले आहे. '...सर्वांस नमन करुन (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके घेऊन सुवर्णकलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळींस नमस्कार करुन सिंहासनावर बसले. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही'.