जेएनएन, मुंबई. Shiv Jayanti 2025: शिवाजी महाराज यांचे जीवन हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांच्या मोहीम, युद्धनीती, धर्म, समाज इत्यादींबद्दलचे त्यांच्या विचारांवर आधारित अनेक कृती मराठीसह इतरही भाषेत प्रकाशित झाले आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 60 पेक्षाही अधिक पुस्तके आहेत. यातील काही पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे. तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतीपर लिखाणे विविध मासिके, वृतपत्रांतून प्रकाशित होत असतात. व या माध्यमातून त्यांची शोर्याची गाथा आजही लाखो लोकांपर्यंत पोहचत आहे.
महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1869 मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंती या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली. आणि येथूनच सुरवात झाली आपल्या राज्यांची कीर्ती पसरविण्याची मोहीम. आजच्या या लेखातून आपण शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणारे, त्यांचे कार्य दाखविणारे पुस्तके , चित्रपट एकूणच त्यांच्यावर आधारित साहित्याबद्दल जाणून घेणार आहोत.
महाराजांवर आधारित चित्रपट
- शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट 1952 साली दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती.
- 1981 साली प्रदर्शित झालेल्या बाळ शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे बालपण दाखविण्यात आले आहे.
- कल्याण खजिना हा चित्रपट 1924 साली प्रदर्शित झाला असून, या चित्रपटांत कल्याणचा खजिना लुटण्याची कथा सांगितली आहे.
शिवाजी महाराजांवर आधारित पुस्तके
छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहे ज्यात त्यांच्या विविध गाथा सांगण्यात आल्या आहे. त्यातीलच काही पुस्तकांची नावे
- राजा शिवछत्रपती -लेखक बाबासाहेब पुरंदरे- 16हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहे. याच पुस्तकावर आधारित जाणता राजा हे नाटक प्रदर्शित केले जाते.
- गड आला पण सिंह गेला-कादंबरी- : ह.ना. आपटे
- श्रीमानयोगी -कादंबरी : रणजित देसाई
- आग्ऱ्याहून सुटका- पु.बा. गोवईकर
- राजा शिवाजी - खंडकाव्य : म.म.कुंटे
- शिवराय - खंडकाव्य : कवी यशवंत
- शिवनामा - काव्य, कवी - मुबारक शेख
- शिवभूषण - निनाद बेडेकर
शिवाजी महाराजांवर आधारित नाटक
- आग्ऱ्याहून सुटका’ (नाटक, लेखक विष्णू हरी औंधकर 1920 च्या सुमारास
- भंगले स्वप्न महाराष्ट्रा (नाटक, लेखक बशीर मोमीन (कवठेकर), 1975च्या सुमारास.
- वेडात मराठे वीर दौडले सात (नाटक, लेखक बशीर मोमीन (कवठेकर), 1977 च्या सुमारास
- लाल महालातील थरारक शिव तांडव (महानाट्य -प्रमुख भूमिका अमोल कोल्हे)