एएनआय, नवी दिल्ली. Nimisha Priya News : येमेनमध्ये जीवन-मरणाची लढाई लढणाऱ्या भारताच्या निमिषा प्रियाबद्दल बरीच चुकीची माहिती पसरवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमिषा यांची फाशी रद्द झालेली नाही.
केरळमधील परिचारिका निमिषा प्रियाला येमेनच्या न्यायालयाने एका खून प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, शेवटच्या क्षणी फाशी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली.
अबुबकरने काय दावा केला होता-
भारताचे ग्रँड मुफ्ती कंठापुरम एपी अबुबकर मुसलियार यांनी दावा केला होता की, "निमिषाची फाशी आधी थांबवण्यात आली होती पण आता ती रद्द करण्यात आली आहे. साना येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर येमेनने निमिषाची फाशी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे."
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
१७ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे प्रकरण संवेदनशील असल्याचे म्हटले आणि निमिषा यांना वाचवण्यासाठी भारताने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे सांगितले.
हेे ही वाचा -निमिषा प्रियाला मृत्यूच्या दाढेतून कोणी बाहेर काढले? CAA वेळीही चर्चेत आले होते 'ग्रँड मुफ्ती'
रणधीर जयस्वाल यांच्या मते, हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे आणि सरकार शक्य तितके प्रयत्न करत आहे. आम्ही पीडिताच्या कुटुंबासाठी वकील नियुक्त केला आहे. आम्ही स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहोत. अलीकडेच भारत सरकारने आणखी काही वेळ मागितला होता. सरकारसह अनेक लोकांच्या प्रयत्नांनंतर, येमेनने निमिषाच्या फाशीची तारीख वाढवली.
फाशी रद्द झाल्याची झाल्याच्या वृत्ताला दुजोरा नाही-
परराष्ट्र मंत्रालयाने निमिषाच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी एक वकीलही नियुक्त केला होता. शरिया कायद्यानुसार निमिषाला वाचवण्यासाठी सर्व मार्ग अवलंबण्यात आले. निमिषाची फाशी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
