जेएनएन, मुंबई. Happy BirthDay Umesh Kamat: मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता उमेश कामत आज 12 डिसेंबर ला आपला वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपट आणि नाटकांमधील भूमिका असो किंवा खऱ्या आयुष्यातील त्याचे व्यक्तिमत्त्व—उमेश प्रेक्षकांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात कायम आपुलकीने स्थान मिळवतो.

उमेशच्या वाढदिवसानिमित्त पत्नी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. प्रियाने लिहिलं आहे—
“माझ्या सर्वात गोंडस नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
बागेत शेक्सपियरशी सहज गप्पा मारणारा आणि नवीन नाटकाची पटकथा मागणारा एकमेव माणूस!
तुझा निरागस विनोद आणि तेजस्वी मन आयुष्य खूप मजेदार बनवते… कधीही बदलू नकोस.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढे येणाऱ्या अनंत उत्तम पटकथांच्या शुभेच्छा!”

प्रियाने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडिओमध्ये उमेश कामत बागेत असलेल्या शेक्सपिअरच्या पुतळ्याशी गप्पा मारताना दिसतो. “मी नाटक शोधतोय… काही नवीन लिहिलंय का? मला आजच्या काळातलं काही द्या, नाटक शोधतोय… तुम्ही लिहिलेलं आजही चालतंय पण आम्हाला थोडं कठीण जातं…” असे संवाद तो मजेत म्हणताना दिसतो.

प्रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत उमेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे हिनेही कमेंट करत लिहिले, “हॅपी बर्थडे माय फेव्हरेट उमेश कामत!” यासोबतच श्रेयाने प्रियाने कॅप्चर केलेल्या या व्हिडिओचेही कौतुक केले आहे.

हेही वाचा: Asha Bhosle च्या या गाण्याने 54 वर्षांपूर्वी उडवून दिली होती खळबळ; टीव्ही आणि रेडिओवर घालण्यात आली होती बंदी