नवी दिल्ली. kannada actress nandini cm suicide : कन्नड चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. 26 वर्षीय टीव्ही स्टार नंदिनी सीएम हिचे सोमवारी निधन झाले. पोलिसांनी सांगितले की तिने आत्महत्या केली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यांनी अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण देखील सांगितले.
नंदिनीला लग्न करायचं नव्हतं -
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की अभिनेत्रीचा मृत्यू केंगेरी परिसरात झाला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने असेही सांगितले की त्यांना अभिनेत्रीची सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये तिने डिप्रेशन आणि वैयक्तिक समस्यांनी ग्रस्त असल्याचे नमूद केले आहे.

चिठ्ठीत, मुलीने म्हटले आहे की तिला लग्न करायचे नाही किंवा सरकारी नोकरी करायची नाही. तिला तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायचे होते, तर तिच्या पालकांना वाचत होते की, तिने आयुष्यात सेटल व्हावे. पोलिसांनी सांगितले की त्यांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या त्यांना घातपाताचा संशय नाही. त्यांनी म्हटले आहे की तपास पुढे जाईल तसे ते तपशील शेअर करतील. सध्या, नंदिनीच्या जवळच्या मित्रांचे आणि कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

या शोमध्ये ती मुख्य भूमिका साकारत होती.
२६ वर्षीय नंदिनी सीएमने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका कन्नड मालिकेत सहाय्यक अभिनेत्री म्हणून केली होती. या मालिकेनंतर ती जीवा हुवागाइड, संघर्ष, मधुमगालु आणि नीनाडे ना सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दिसली. नंदिनीने तमिळ मालिका "गौरी" मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत तिने कनका आणि दुर्गा ही दुहेरी भूमिका साकारली होती. अलीकडेच, तिच्या मालिकेतील एक दृश्य, ज्यामध्ये ती विष पिते, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.
दोन दिवसांपूर्वी, नंदिनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या शोशी संबंधित एक प्रोमो शेअर केला होता. इंस्टाग्राम फोटोंमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. नंदिनीच्या कमी वयात झालेल्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
