जेएनएन, पुणे. 10th-12th Exam Timetable 2026: पुण्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक (SSC - HSC Exam Timetable 2026) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता विद्यार्थांकडे अभ्यास करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा (SSC - HSC Exam Schedule 2026)

त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

या परीक्षा होणार

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता बारावी, दहावीची लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा घेण्यात येतात. 

बारावीच्या परीक्षा कधी? (When is HSC Exam 2026)

    प्रसिद्धिपत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. त्यात माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही समावेश आहे.

    दहावीची परीक्षा कधी? (When is SSC Exam 2026)

    दहावीची लेखी परीक्षा (SSC Board Exam) ही 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचाही त्यात समावेश आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. 

    सविस्तर अंतिम वेळापत्रक लवकरच होणार जाहीर

    शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या उद्देशाने, तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेच्या प्रात्यक्षिक, लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.