जेएनएन, मुंबई. Maharashtra HSC Result 2025 Update: इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा जाहीर झाला आहे.  यावर्षी महाराष्ट्राचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला असून, नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तो मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये (नियमित विद्यार्थी):  

  • एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  •  उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88% आहे.  
  • कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (96.74 %) आणि लातूर विभागाचा सर्वात कमी (89.46%) लागला.
  • मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% असून मुलांची 89.51 % आहे. मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% ने जास्त आहे.
  • 154 विषयांपैकी 37 विषयांचा निकाल 100 % लागला.  
  • फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल (91.88%) हा फेब्रुवारी-मार्च 2024 च्या निकालापेक्षा (93.37%) 1.49% ने कमी आहे.  
  • खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या 36,133 विद्यार्थ्यांपैकी 35,697 प्रविष्ट झाले आणि 29,892 उत्तीर्ण झाले, उत्तीर्णतेची टक्केवारी 83.73% आहे.
  • पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65% आहे.
  • नियमित, खाजगी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांना मिळून एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 90.16% आहे.
  • 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 7,258 प्रविष्ट झाले आणि 6,705 उत्तीर्ण झाले, उत्तीर्णतेची टक्केवारी 92.38% आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार सवलतीचे गुण देण्यात आले आहेत

हेही वाचा - MSBSHSE 12th Result Update: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; कोणत्या विभागाने मारली बाजी

इतर निकालाची माहिती:

  • खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 83.73% आहे.  
  • पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 37.65% आहे.  
  • नियमित, खाजगी आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 90.16% आहे.

शाखानिहाय निकाल (नियमित विद्यार्थी):  

    विभागीय मंडळनिहाय निकालाची टक्केवारी (नियमित विद्यार्थी):

    अ.क्र.विभागीय मंडळनोंदणी झालेले (Registered)प्रविष्ट (Appeared)एकूण उत्तीर्णउत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण (%)
    1पुणे24429424267122163191.32
    2नागपूर15204615111613680590.52
    3छत्रपती संभाजीनगर18175917990416596192.24
    4मुंबई31511831414428973192.23
    5कोल्हापूर11686011606010938994.25
    6अमरावती15480315385314253192.64
    7नाशिक16229016101714781691.80
    8लातूर96629957808560489.46
    9कोकण43286432244180596.74
    एकूणराज्य14270851417969130287391.88