जेएनएन, मुंबई. Maharashtra FYJC Admission Registration 2026: इयत्ता अकरावीच्या 2026-27 च्या शैक्षणिक सत्रातील केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 10 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आज (19 एप्रिल) 2 लाख 77 हजार 375 विद्यार्थांनी अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.

30 एप्रिल शेवटची तारीख

विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 एप्रिल रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू झाली असून 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5:00 वाजता संपेल, त्यानंतर नोंदणी करता येणार नाही. त्यामुळे 10 वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थांनी लगेच आपली नोंदणी करून घ्यावी.

ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक 

गतवर्षीपासून संपूर्ण राज्यभरामध्ये ऑनलाईन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षण संचालनालयाकडून यंदा अकरावी प्रवेश परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून प्रवेश नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. ही नोंदणी प्रक्रिया 30 एप्रिल रोजी सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत दहावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्जाचा पहिला भाग पूर्ण करणे बंधनकारक आहे.  

अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी कशी करावी.

    • सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in/ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. 
    • त्यानंतर या विंडोमधील Student Registration वर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल. 
    • या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्व भरावी. 
    • शेवटी आपला Password तयार करून घ्यावा. 
    • आणि आपला Registration Number आणि Password जपून ठेवावा. 

    हेही वाचा - Maharashtra Board SSC HSC Result 2026: कधी लागणार दहावी, बारावीचा निकाल?  तारखांसंदर्भात मोठी अपडेट समोर!