जेएनएन, नवी दिल्ली. Maharashtra Board SSC HSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. आता या परीक्षांच्या निकालाकडे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची नजर लागली आहे. पुणे बोर्डाकडून निकालाची अद्याप कोणतीही अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही. पण गेल्या काही वर्षांच्या पद्धतीनुसार अंदाज बांधला तर मे महिन्यात निकाल येण्याची शक्यता दिसते.
दहावी - बारावीची परीक्षा कधी झाल्या?
2025-26 च्या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत झाली, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत घेण्यात आली.
कसा पाहायचा निकाल?
- निकाल जाहीर झाल्यावर तो mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर सहज पाहता येईल.
- विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
- त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल वेबसाईटवर दिसेल.
- विद्यार्थांनी त्याची एक प्रत काढून घ्यावी किंवा निकाल सेव्ह करून ठेवावा.
- बोर्डाच्या mahahsscboard.in या साइटवरही माहिती मिळू शकणार आहे.
मागील तीन वर्षांचा अनुभव काय सांगतो?
- गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये बारावीचा निकाल 5 मे ला लागला होता आणि दहावीचा 13 मे ला.
- 2024 मध्ये बारावी 21 मे ला आणि दहावी 27 मे ला जाहीर झाला.
- 2023 मध्ये बारावी 25 मे ला आणि दहावी 2 जून ला आला.
या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते की मे महिन्यातच निकाल येतात आणि बारावी आधी, दहावी नंतर येतो. याच आधारावर यंदाही अंदाज बांधला जात आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावी परीक्षांचा निकाल कधी लागणार?
मागील तीन वर्षांच्या तारखा पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येते की, बारावीच्या परीक्षांचा निकाल हा मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. निकालानंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दहावीचे रिझल्ट समोर येऊ शकते. यामुळे दहावीचे विद्यार्थी थोडे अधिक वेळ थांबावे लागणार आहेत.
2026 च्या दहावी-बारावीच्या निकालाची अंदाजित वेळ (When Will Class 10 and 12 Results Be Declared)
12 वी (When Will HSC result Declared) : मे 2026 चा पहिला किंवा दुसरा आठवडा
10 वी (When Will SSC result Declared): मे 2026 चा दुसरा किंवा तिसरा आठवडा
