जेएनएन, नवी दिल्ली. Maharashtra Board Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. 2025-26 च्या शैक्षणिक वर्षातील दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत घेण्यात आली. आता या परीक्षांच्या निकालाकडे सर्वांची नजर लागली आहे. mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर दहावी निकाल पाहता येईल.
दहावीचा कसा पाहायचा निकाल?
- निकाल जाहीर झाल्यावर तो mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर सहज पाहता येईल.
- विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
- त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल वेबसाईटवर दिसेल.
- विद्यार्थांनी त्याची एक प्रत काढून घ्यावी किंवा निकाल सेव्ह करून ठेवावा.
- बोर्डाच्या mahahsscboard.in या साइटवरही माहिती मिळू शकणार आहे.
मागील तीन वर्षांचा अनुभव काय सांगतो?
- गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये दहावीचा 13 मे रोजी लागला होता.
- 2024 मध्ये दहावीचा निकाल हा 27 मे रोजी जाहीर झाला होता.
- 2023 मध्ये दहावीचा निकाल 2 जून रोजी जाहीर झाला होता.
- या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते की मे महिन्यातच निकाल येतात आणि बारावी आधी, दहावी नंतर येतो. याच आधारावर यंदाही अंदाज बांधला जात आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार?
मागील तीन वर्षांच्या तारखा पाहिल्यावर आपल्याला हे लक्षात येते की, बारावीच्या परीक्षांचा निकाल हा मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. निकालानंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दहावीचे रिझल्ट समोर येऊ शकते. यामुळे दहावीचे विद्यार्थी थोडे अधिक वेळ थांबावे लागणार आहेत.
2026 च्या दहावीच्या निकालाची अंदाजित वेळ (When Will Class 10 Results Out)
10 वी (When Will SSC result Declared): मे 2026 चा दुसरा किंवा तिसरा आठवडा
