जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 च्या निकालाबाबत एक निवेदन दिले आहे. बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.
निकाल घटला
बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून राज्यभरातून 14 लाख 33 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. गेल्यावर्षी बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला होता.
मुलींनी मारली बाजी
दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. 93.25 टक्के मुली, तर 86.80 टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे मुलांच्या तुलनेत 6.35 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षा घेण्यात आलेल्या 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला.
शाखानिहाय निकाल
- विज्ञान – 96.44 टक्के
- कला – 78.02टक्के
- वाणिज्य – 87.04 टक्के,
- व्यवसाय अभ्यासक्रम – 82.74 टक्के
- आयटीआय – 81.78 टक्के
हेही वाचा - HSC Result 2026 Out: बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल
