जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 च्या निकालाबाबत एक निवेदन दिले आहे. बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result 2026) अधिकृत संकेतस्थळांवर 2 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात होणार आहे. 

15 लाख विद्यार्थांनी दिली परीक्षा

पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली आहे. यंदा नोदणी केलेल्या 15,32,487 विद्यार्थ्यांमध्ये 8,20,229 मुले, 7,12,240 मुली, तर 18 तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. गेल्या वर्षी विज्ञान शाखेची उत्तीर्णतेची टक्केवारी 97.35%, कला शाखेची 92.68%, वाणिज्य शाखेची 92.68% आणि व्यावसायिक शाखेची 83.3% अशी होती.

बारावीचा निकाल कुठे पाहायचा? 

विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी results.digilocker.gov.in आणि mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळवर भेट देऊ शकतात. निकालाची लिंक दुपारी 1 वाजल्यापासून सक्रिय होईल. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट्सचाच वापर करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

बारावीचा निकाल कसा पाहायचा?

  • वरीलपैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होमपेजवरील 'HSC Examination Result 2026' या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा रोल नंबर/आसन क्रमांक टाका.
  • आईचे नाव (पहिले नाव) टाइप करा.
  • 'View Result' बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • तो प्रिंट किंवा डाउनलोड करून व्यवस्थीत ठेवा.

कोणत्या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार 

  •  https://results.digilocker.gov.in
  •  https://mahahsscboard.in

दहावी - बारावीची परीक्षा कधी झाल्या? 

    2025-26 च्या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत झाली, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत घेण्यात आली.  

    2026 च्या बारावीच्या निकालाची वेळ (Class 12 Result on 2 May)

    12 वी (When HSC result Declared) : 2 मे 2026 चा रोजी दुपारी 1 वाजता.