जेएनएन, मुंबई. Maharashtra Board SSC Result 2025 Update: बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावी (SSC) च्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कधी लागेल, याची प्रतिक्षा आहे. सर्व विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक दहावीच्या निकालाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. महाराष्ट्र बोर्ड लवकरच दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर mahahsscboard.in वर जाहीर होणार आहे. SSC निकाल 2025 लिंकच्या मदतीने विद्यार्थी आपली मार्कशीट ऑनलाइन पाहू शकतील.

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार 

दहावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत दहावीचा निकाल जाहीर होईल, असं बोर्डाने पूर्वी सांगितलं होतं. यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.

दहावीचा निकाल कसा पाहायचा? (How To Check 10th Result 2025)

महाराष्ट्र बोर्डाचा एसएससी निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा वापर करावा लागेल:

  • सर्वप्रथम, महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइटवर जा:
    - www.mahahsscboard.in
    - mahresult.nic
    - hscresult.mkcl.org
  • वेबसाइट उघडल्यानंतर, निकालाचा दिवशी लिंक सक्रिय झाल्यानंतर "Maharashtra State Board, SSC Examination February 2025 Result" वर क्लिक करा.
  • त्यानंतर View SSC Result या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर, तुमच्यासमोर निकालासंदर्भात विंडो उघडेल.
  • यात तुमचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचं नाव (Mother's First Name) भरून View Result या बटणावर क्लिक करा.
  • तुमचं एसएससी निकाल (SSC Result ) स्क्रीनवर दिसेल.
  • त्यानंतर पीडीएफ डाउनलोड करा आणि तो सुरक्षित ठेवा, जोपर्यंत तुम्हाला तुमची खऱ्या मार्कशीट मिळत नाही.

किती विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

    राज्य शिक्षण मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत दहावीची परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेसाठी एकूण 16,11,610  विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,64,120 मुले, तर 7,47,471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 5,130 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.  

    कोणत्या विभागातून किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

    मुंबई विभागातून 3,60,317 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर पुणे विभागातून 2,75,004 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर सर्वात कमी कोकण विभागात 27 हजार विद्यार्थी संख्या आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांसाठी 644 परीक्षा केंद्र आहेत. तर 1 लाख 88 हजार 777 नियमित विद्यार्थी असल्याची माहिती मंडळाकडून मिळाली.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाबद्दल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) हे दहावीसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षा आणि बारावीसाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार राज्य मंडळ आहे. हे मंडळ शाळांसाठी अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक मार्गदर्शक तत्त्वे विकसित करते, ज्यामध्ये विज्ञान, वाणिज्य आणि कला अशा विविध शाखांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मंडळाचे उद्दिष्ट राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि आधुनिक शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक पद्धतींमध्ये सतत सुधारणा करणे आहे.