जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार राज्यातील एकूण 91.88 टक्के विद्यार्थी 12 वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. 

12 वी चा निकाल जाहीर झाल्यांनतर आता पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असेल ते करिअरच्या दृष्टीने कोणत्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी त्यांचे करिअर घडवू शकतात. 10 वी नंतर सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या तीनच शाखांमध्ये प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांचा कल असतो. परंतु, या शाखांमध्ये उत्तीर्ण झाल्यांनतर कोणत्या क्षेत्रात आपण करिअर घडवू शकतो या बद्दल अनेकदा विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. आजच्या या लेखातून आपण 12 वी नंतरच्या करिअर संधी जाणून घेणार आहोत. 

1. विज्ञान शाखा (Science):

  • इंजिनीअरिंग (B.E./B.Tech) – JEE, MHT-CET, VITEEE सारख्या परीक्षांनंतर
  • वैद्यकीय क्षेत्र (MBBS, BDS, BAMS, BHMS) – NEET आवश्यक
  • फार्मसी (B.Pharm)
  • बी.एससी. (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, संगणक विज्ञान इ.)
  • बी.एससी. कृषी / वनीकरण / फलोत्पादन
  • बायोमेडिकल / बायोटेक्नॉलॉजी / सूक्ष्मजीवशास्त्र
  • डेटा सायन्स / एआय / मशीन लर्निंग (कोर्सेस + पदवी कार्यक्रम)

2. वाणिज्य शाखा (Commerce):

  • बी.कॉम (जनरल / अकाउंटिंग आणि फायनान्स / बँकिंग)
  • सीए (चार्टर्ड अकाउंटंट)
  • सीएस (कंपनी सेक्रेटरी)
  • सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट)
  • बीबीए / बीएमएस (मॅनेजमेंट कोर्सेस)
  • हॉटेल मॅनेजमेंट / टुरिझम मॅनेजमेंट
  • बँकिंग / फायनान्स / इन्व्हेस्टमेंट बँकिंग कोर्सेस

3. कला शाखा (Arts):

  • बीए (इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र इ.)
  • मास कम्युनिकेशन / पत्रकारिता
  • कायदा (5 वर्षे इंटिग्रेटेड - बीए एलएलबी)
  • ललित कला / सादरीकरण कला
  • फॅशन डिझाइन / इंटिरियर डिझाइन
  • सामाजिक कार्य (बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू)

4. सर्व शाखांसाठी खुले कोर्सेस / क्षेत्रे:

    • ॲनिमेशन / ग्राफिक डिझाइन / गेम डिझाइन
    • इव्हेंट मॅनेजमेंट
    • डिजिटल मार्केटिंग
    • यूपीएससी / एमपीएससी परीक्षा परीक्षा
    • संरक्षण सेवा – एनडीए (नॅशनल डिफेन्स अकादमी)
    • रेल्वे, बँकिंग, एसएससी सरकारी नोकरदार