जेएनएन, मुंबई. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. 93.25 टक्के मुली उत्तिर्ण झाल्या आहेत. तर यंदा 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

14 लाख 33 हजार विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून राज्यभरातून 14 लाख 33 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 89.79 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा 1444713 विद्यार्थांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 1286843 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 157870 विद्यार्थी नापास झाले आहेत.

लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल

राज्याच्या नऊ विभागांपैकी लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. 84.14 टक्के इतका हा निकाल आहे. मागच्या वर्षीही लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल होता.

 Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीचा विभागनिहाय निकाल

    HSC 12th Result 2026: DigiLocker द्वारे निकाल कसा तपासावा

    • DigiLocker वरून तुमचा निकाल डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला (website) भेट द्या: www.digilocker.gov.in.
    • आता, संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर (homepage) असलेल्या 'VIEW RESULT' या विभागावर क्लिक करा.
    • त्यानंतर, 'Maharashtra Board 12th Result 2026' या दुव्यावर (link) क्लिक करा.
    • दुव्यावर क्लिक केल्यानंतर, विचारलेली आवश्यक माहिती भरा.
    • सर्व माहिती भरून झाल्यानंतर, तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

    हेही वाचा - HSC Result 2026 Out: बारावीचा निकाल जाहीर, mahahsscboard.in वर एका क्लिकवर असा पाहा निकाल

    बारावीचा निकाल Download Link

    विभागविद्यार्थीपास झालेलेटक्के(%)
    PUNE244,191220,68091.25
    NAGPUR153,256134,98888.67
    C. SAMBHAJINAGAR184,841162,02288.68
    MUMBAI324,739291,41590.08
    KOLHAPUR111,48299,39889.97
    AMRAVATI148,931134,35290.92
    NASIK162,914146,79990.72
    LATUR91,32675,64184.14
    KONKAN23,03321,54894.14
    TOTAL1,444,7131,286,84389.79