डिजिटल डेस्क, नवी दिल्ली - Retail sugar prices in India: सरकारकडून साखरेच्या आयातीस परवानगी देणे, स्टॉक करून ठेवण्यास बंदी आणि साठेबाजांवर कडक कारवाईनंतर गुरुवारी किरकोळ बाजारात साखरेच्या किंमती काही प्रमाणात उतरल्या आहेत. आता साखर 64.33 रुपये प्रति किलो झाली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, गुरुवारी साखरेची अखिल भारतीय सरासरी किंमत ₹64.33 प्रति किलो होती, जी 26 ऑगस्ट रोजी ₹65.05 प्रति किलो होती.
अचानक का कमी झाले दर?
सरकारच्या 10 लाख टन कच्ची साखर विना ड्यूटी आयातीस परवानगी देण्याच्या निर्णयानंतर एक्स-मिल किंमतींमध्ये जवळपास 20 टक्के घसरण झाली मात्र किरकोळ दर चढेच राहिले.
साखरेची सध्याची सरासरी किंमत एक महिना आधीच्या पातळीहून 31 टक्के आणि एक वर्षाच्या किंमतींच्या तुलनेत 39 टक्क्यांनी अधिक आहे.
इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने म्हटले, 'साखरेच्या उच्चांकी दरांहून सध्या जवळपास 20 टक्के घसरण झाली आहे. कारण पुरवठा सुरुळीत करण्यासंबंधीचे उपाय आणि बाजाराच्या चांगल्या स्थितीचा परिणाम दिसू लागला आहे.
आशा आहे की, किंमती कमी होण्याचे सत्र सुरुच राहील, कारण सणासुदीला होणारी खेरदी सामान्यपणे सुरू आहे आणि आगामी काही आठवड्यात नवीन साखर बाजारात दाखल होईल.
