नवी दिल्ली: आगामी सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईपासन मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रातील लासलगावहून 450 टन कांदा घेऊन 'कांदा एक्सप्रेस' (kanda express) दिल्लीकडे रवाना झाली आहे.

कधी येणार कांद्याचा स्टॉक?

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ लासलगावहून जवळपास 450 टन कांदा घेऊन एक विशेष मालगाडी बुधवारी दुपारी दिल्लीकडे रवाना झाली. 21 डब्ब्यांची ‘कांदा एक्सप्रेस’ बुधवारी दुपारी 3.10 वाजता दिल्लीकडे रवाना झाली. ही गाडी गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील बाजारपेठेत कांद्याच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्राहक व पुरवठा विभागाच्या निर्देशाने या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शहरी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मूल्य स्थिरीकरण कोषनुसार खरेदी केलेल्या बफर स्टॉकमधील 840 टन कांदा दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. लासलगावचे स्टेशन व्यवस्थापक प्रितेश दुबे यांनी म्हटले की, जवळपास 450 टन कांदा घेऊन ‘कांदा एक्सप्रेस’ दिल्लीला रवाना करण्यात आली आहे. ट्रेन दिल्लीजवळील आदर्शनगर स्टेशनवर दाखल होणार आहे. 

महागाईपासून मिळणार दिलासा -

त्याचबरोबर केंद्र सरकारने राष्ट्रीय राजधानीत गुरुवारपासून केवळ ₹35 प्रति किलो या सवलतीच्या दराने (subsidized rate) कांदाची किरकोळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.  ग्राहक मंत्रालयानुसार या खास सवसिडी असणाऱ्या विक्रीचे उद्घाटन गुरुवारी क्रेंद्रीय खाद्य मंत्री प्रल्हाद जोशी करणार आहे. सरकारचा उद्देश्य बाजारात कांदाचे वाढते दर (onion price) नियंत्रित करणे व सामान्य जनतेला स्वस्त दरात कांदा उपलब्ध करणे आहे. 

    कोणाच्या माध्यमातून मिळणार कांदा?

    दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील लोकांना स्वस्त दरात कांदा पोहोचवण्याची जबाबदार केंद्र सरकारने तीन प्रमुख एजन्सीजना सोपवली आहे.

    1. नोफेड (NAFED)

    2. एनसीसीएफ (NCCF)

    3. केंद्रीय भंडार (Kendriya Bhandar)

    एनसीसीएफ (NCCF) चे संचालक एनिस जोसेफ चंद्रा यांनी न्यूज एजन्सी पीटीआयला सांगितले की, गुरुवारपासून दिल्लीतील विविध भागात या स्वस्त कांद्याची विक्री सुरू केली जाईल. त्यानंतर विकेंडला (Weekend) याची व्याप्ती वाढवून संपूर्ण एनसीआर (NCR) क्षेत्राला याचा लाभ दिला जाईल.

    बफर स्टॉकमधून येत आहे कांदा -

    बाजारातील किंमती सुरक्षित करण्यासाठी कांदा उपलब्ध केला जात आहे. हा कांदा 2016 साठी उत्पादक राज्यांत सुरक्षित ठेवला गेलेल्या 121 लाख टन बफर स्टॉकमधून घेतला जात आहे. माहितीनुसार या एकूण स्टॉकमधून एकट्या एनसीसीएफजवळ 62 हजार टन कांद्याचा सुरक्षित साठा (onion buffer stock) उपलब्ध आहे.