जेएनएन, मुंबई. लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. अनेक लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाहीये, अशी चर्चा सुरु आहे. या लाभार्भी महिला कोण आहेत, याविषयी माहिती घेऊया…
मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करुन ऑगस्टचा हप्ता जमा होत असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.' असे ट्वीट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) September 11, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली… pic.twitter.com/oRnOcQxuzP
यांना मिळणार नाही लाभ? (These Women Will Not Take Benefit Of Ladki Bahin Yojana)
मागील काही दिवसांपूर्वी X वरील एका पोस्टमध्ये, त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला होता की, सुमारे 26.34 लाख व्यक्ती अपात्र असूनही योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवत आहेत. त्यांनी सांगितले की असे आढळून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते, काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी होते आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केला होता. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, जून 2025 पासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आलेले आहेत, असे त्यांनी म्हटले होते. या लाभार्थांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही अशी शक्यता आहे. मात्र, अद्याप अधिकृत समोर आले नाही.
तर लाभ पुन्हा सुरु होणार
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांच्या आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्व्हे करण्याचे काम सुरु आहे. जिल्हा प्रशासनाकडून संबंधित अहवाल महिला व बालकल्याण विभाग मागवत आहे. तटकरे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, स्थानिक पातळीवर काम सुरु आहे. त्यांचा विभाग माहिती घेत असून जो लाभार्थी पात्र असेल त्यांचा लाभ पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, आदिती तटकरे यांची माहिती
लाडकी बहिण योजनेचे निकष काय आहेत
- लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे.
- दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे
- ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही योजनेतून बाद केले जाईल.
- अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल.
- लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
- नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही.
- अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
- अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केले जाईल.
- नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जाणार नाही.
लाडकी बहीण योजनेतून महिला अपात्र होण्याची कारणे काय आहेत
- लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ज्या महिला 21 ते 65 वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख असायला हवे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत.
- जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये.
- अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जमा, तुमच्या खात्यात पैसै आले नसतील तर…