नवी दिल्ली.Gold silver Prices Today : ट्रम्प टॅरिफच्या भीतीमुळे सोने आणि चांदीच्या किमती सतत वाढ होताना दिसत आहे. सोन्याची किंमत दररोज एक नवा विक्रम करत आहे. आज म्हणजेच 2 सप्टेंबर रोजीही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचा आजचा भाव काय आहे, ते जाणून घेऊया.

Gold Rate Today: सोन्याचा भाव किती आहे?

2 सप्टेंबर रोजी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 105,258 रुपये नोंदवण्यात आला. त्यात प्रति 10 ग्रॅम 473 रुपयांची वाढ दिसून आली आहे. सोन्याने आतापर्यंत 104,850 रुपयांचा नीचांकी आणि 105,358 रुपयांचा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

काल, 1 सप्टेंबर रोजी IBJA मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 104490 रुपये होती.

Silver Rate Today: चांदीचा भाव किती आहे?

2 सप्टेंबर रोजी एमसीएक्समध्ये 1 किलो चांदीचा भाव 123321 रुपये होता. सकाळी 11.20 वाजता तो प्रति किलो 686 रुपयांनी वाढला आहे. चांदीने आतापर्यंत 123146 रुपयांचा नीचांकी आणि 123528 रुपयांचा उच्चांक नोंदवला आहे.