वी दिल्ली. Gold Price Today : गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत होती. पण आज १३ ऑगस्ट रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ नोंदवण्यात आली आहे. बुलियन्स आणि एमसीएक्स दोन्हीमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. कालप्रमाणे आजही चांदीची चमक कायम आहे.
आज सोन्याचा Gold Price) भाव किती आहे?
बुधवारी सकाळी 10.53 वाजता, एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 99,723 रुपयांवर चालू आहे. सध्या त्यात 103 रुपयांची वाढ दिसून येत आहे. आतापर्यंत सोन्याने 99,528 रुपयांचा नीचांकी दर आणि 99,759 रुपयांचा उच्चांक नोंदवला आहे.
काल तो प्रति 10 ग्रॅम 99,620 रुपयांवर बंद झाला होता.
बुलियन्समध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत सध्या 100,350 रुपये आहे. यामध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,990 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75,260 रुपये आहे.
चांदीची किंमत किती आहे?
सकाळी 10.57 वाजता, एमसीएक्सवर 1 किलो चांदीचा भाव 1,14,470 रुपयांवर चालू आहे. यामध्ये 723 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीने आतापर्यंत 11,4199 रुपयांचा उच्चांक आणि 114,666 रुपयांचा नीचांक नोंदवला आहे.
बुलियन्समध्ये 1 किलो चांदीची किंमत 114,660 रुपये आहे. यामध्ये प्रति किलो 850 रुपयांची वाढ झाली आहे.
काल किंमत किती होती?
काल सकाळी 11 वाजता, एमसीएक्समध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 99,714 रुपये नोंदवण्यात आला. यामध्ये फक्त 61 रुपयांची घसरण झाली होती. सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 100,400 रुपये नोंदवण्यात आला. यामध्ये 140 रुपयांची घसरण झाली होती. काल, सोन्याच्या 1 किलो चांदीचा भाव 113,970 रुपये होता. यामध्ये 200 रुपयांची वाढ झाली होती.