नवी दिल्ली. Gold Price Hike : ट्रम्प टॅरिफच्या भीतीमुळे सोने आणि चांदीचे दर सतत वाढत आहेत. सणासुदीचा काळ देखील या वाढीचे एक कारण मानले जाते. आज 1 सप्टेंबर रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. आज सोने आणि चांदीचा भाव कितीपर्यंत पोहोचला आहे ते जाणून घेऊया.
Gold Price Today: सोन्याचा भाव किती आहे?
सकाळी 10.35 वाजता, एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 104,975 रुपयांवर पोहोचला आहे. तो प्रति 10 ग्रॅम 1151 रुपयांनी वाढला आहे. यापूर्वी तो प्रति 10 ग्रॅम 103824 रुपयांवर बंद झाला होता.
आयबीजेएमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 10239 रुपये नोंदवण्यात आली आहे.
Silver Price Today: चांदीचा भाव किती आहे?
सकाळी 10.38 वाजता 1 किलो चांदीचा भाव 122631 रुपये नोंदवण्यात आला. चांदीने आतापर्यंत 123000 रुपयांचा उच्चांक आणि 120,844 रुपयांचा निचांक नोंदवला आहे. सकाळी 11 वाजता चांदीमध्ये प्रति 10 ग्रॅम 2259 रुपयांची वाढ झाली आहे.
त्याआधी चांदीचा दर 120371 रुपये प्रति किलोवर बंद झाला.