मुंबई - Gold price today : सोने आणि चांदीच्या किमतीत दरवाढीचे सत्र सुरुच आहे. सोन्याची किंमत दररोज नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. याची अनेक कारणे असू शकतात. तथापि, आज चांदीमध्ये थोडीशी वाढ दिसून आली आहे. सोन्याचा आणि चांदीच्या दरात आठवड्याच्या तिसऱ्या दिवसी सोन्याच्या किमतीत वाढ दिसत आहे. सोन्याच्या दराने ऑगस्ट महिन्यांपासून लाखाचा आकडा पार केला आहे. आज सोन्याच्या दरात जवळपास 300 रुपयांची वाढ दिसून आली.
यासोबतच, कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीनेही एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्यांदाच कॉमेक्सवर सोन्याचा भाव 3600 डॉलरच्या पुढे गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचा सध्याचा भाव काय आहे ते जाणून घेऊया.
24 कॅरेट सोन्याचा आजचा दर-
मुंबई- 1,06,970 रुपये
पुणे - 1,06,970 रुपये
नागपूर-1,06,970 रुपये
कोल्हापूर-1,06,970 रुपये
जळगाव -1,06,970 रुपये
ठाणे -1,06,970 रुपये
Gold Price Today: सोन्याचा भाव किती आहे?
एमसीएक्समध्ये सोन्याचा भाव 106072 रुपयांवर सुरू आहे. त्यात प्रति 10 ग्रॅम 280 रुपयांची वाढ झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत सोन्याने 105,925 रुपयांचा नीचांकी आणि 106,199 रुपयांचा उच्चांक नोंदवला आहे. ट्रम्पच्या टॅरिफच्या धास्तीने आणि या महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याच्या वाढत्या अपेक्षांमुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या.
Silver Price: चांदीची किंमत किती आहे?
एमसीएक्समध्ये सकाळी 10 वाजता चांदीचा भाव 122622 रुपये आहे. सध्या त्यात 19 रुपयांची घसरण दिसून येत आहे. चांदीने आतापर्यंत 122600 रुपयांचा नीचांकी आणि 122800 रुपयांचा उच्चांक नोंदवला आहे.