नवी दिल्ली - How to link Aadhaar with mobile व्यक्तीच्या आयडेंटी प्रूफसाठी आधार कार्ड सर्वात महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेत खाते उघडणे, आयकर रिटर्न दाखल करणे, नवीन सिम कार्ड खरेदी करणे, पीएम किसान योजना आणि पीएम आवास योजना सारख्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. जर तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक नसेल तर तो लवकरात लवकर लिंक करून घ्या. आधार नंबर जारी करणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने म्हटले आहे की, तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असेल तर तुम्ही मोबाइलमधील ओटीपी सत्यापनच्या माध्यमातून तुमच्या कार्डमधील नोंदी आवश्यकतेनुसार बदलू किंवा अपडेट करू शकता.
आधारला मोबाइल लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
UIDAI अनुसार, तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. तुम्हाला केवळ तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्रात जावे लागेल आणि तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी जोडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.
आधारशी मोबाइल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया -
1- जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा आधार अपडेट केंद्रात जावा.
2 - तेथे आधार अपडेट फॉर्म भरा.
3 - आधार अपडेट फॉर्ममध्ये तुमचा अपडेट केला गेलेला मोबाइल नंबर नोंद करा.
4 -– त्यानंतर आधार सेवा केंद्रावर 50 रुपये शुल्क भरा.
5 - आधार सेवा केंद्रावर Executive Biometric Authentication च्या माध्यमातून तुमची रिक्वेस्ट रजिस्टर्ड केली जाईल.
6 – त्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल, त्यामध्ये Unique Reference Number (URN) नोंद असेल. या URN च्या माध्यमातून तुम्ही रिक्वेस्ट का स्टेटस ट्रॅक करू शकाल.
आधार कार्ड (Aadhaar Card) बनवताना मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीही नोंद करावी लागते. त्यामुळे आधारच्या डेटाबेसमध्ये सुरक्षित राहते. दरम्यान तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असेल तर अनेक फायनांशियल आणि सोशल सिक्युरिटीची सेवा सहजतेने एक्सेस केली जाऊ शकते. आजच्या काळात एड्रेस चेंज करण्यापासून ऑनलाइन ओपीडीची अप्वॉइंटमेंट घेणे आणि आयटीआर व्हेरिफिकेशन आधारच्या माध्यमातून करू शकता. यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असला पाहिजे. सामान्यपणे ही समस्या असते की, तुम्ही आधार बनवताना जो मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी दिली आहे ती तुमच्या लक्षात नसते. खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्ही आपला मोबाइल नंबर बदलला असेल किंवा दोनहून अधिक ईमेल आयडी वापरत असाल. UIDAI आधार कार्डधारकांना व्हेरिफाई ईमेल/मोबाइल नंबरची सुविधा प्रदान करते. याच्या मदतीने तुम्ही जाणू शकता की, यूआयडीएआयच्या डेटाबेसमध्ये तुमचा मोबाइल नंबर/ईमेल रजिस्टर्ड आहे की नाही. तसे हे जाणण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे.
मोबाईल रजिस्टर्ड आहे की नाही या पद्धतीने चेक करा -
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जावा.
त्यानंतर माय आधार टॅबमध्ये व्हेरिफाई ईमेल/मोबाइल नंबर ऑप्शन निवडा.
त्यानंतर होम पेजवर एक नवीन पेज ओपन होईल. येथे आपला आधार नंबर, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी भरा. यामध्ये तुम्ही तोच मोबाइल नंबर आणि आयडी नोंद करा जी व्हेरिफाय करायची आहे.
त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करून सेंड ओटीपी वर क्लिक करा.
दिलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, जर ईमेल आयडी दिली असेल तर मेल वर ओटीपी येईल.
आता दिलेल्या बॉक्समध्ये ओटीपी एंटर करा.
त्यानंतर दिलेला मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी UIDAI च्या रेकॉर्डशी सुसंगत असेल तर स्क्रीन वर मेसेज येईल की तुम्ही दिलेला मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी रेकॉर्डशी जुळत आहे.
जर दुसरा कोणता मोबाइल नंबर/ईमेल रजिस्टर असेल तर व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये टाकलेला मोबाइल नंबर/ईमेल सुसंगत नसल्याचा मेसेज येईल. यामुळे तुम्हाला कळेल की आधार बनवताना तुम्ही दुसरा कोणता तरी मोबाइल नंबर/ईमेल दिला आहे.
आधारला मोबाइलशी असे करा लिंक -
जर तुमचा सध्याचा मोबाइल नंबर आधारशी लिंक नसेल तर तुम्ही दोन पद्धतीने लिंक करू शकता. प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही सिम आधारशी लिंक करू शकता.
आधार-मोबाइलशी लिंक करण्याची ऑफलाइन पद्धत -
तुम्हाला टेलीकॉम ऑपरेटरच्या आउटलेट वर आधार कार्डची अटेस्टेड कॉपी घेऊन जावे लागेल.
ऑपरेटरला तुमचा मोबाइल नंबर द्या.
तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबर वर स्टोर एक्झिक्यूटिव्ह एक OTP पाठवेल, हा OTP व्हेरिफिकेशनसाठी एक्झिक्यूटिव्हला द्यावा लागेल.
त्यानंतर एक्झिक्यूटिव्ह तुमचे फिंगर प्रिंट घेईल, टेलीकॉम ऑपरेटर तुम्हाला एक कन्फर्मेशन SMS पाठवेल.
SMS ला उत्तर Y लिहून पाठवा. त्यानंतर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.
आधार-मोबाइलशी लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया -
सर्वात आधी UIDAI ची वेबसाइट https://www.uidai.gov.in/ वर जावा.
येथे तुम्हाला 'MY AADHAAR' टॅब वर जाऊन 'LOCATE AN ENROLMENT CENTRE' वर क्लिक करा.
आता एक नवीन पेज ओपन होईल तेथे काही माहिती भरून तुम्ही जवळच्या नामांकन केंद्राचा पत्ता मिळवू शकता.
त्यानंतर तुम्हाला आधार केंद्रात जाऊन आधार सुधारणा फॉर्म भरावा लागेल.
या फॉर्ममध्ये कार्डधारकाला आपला एक्टिव मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. जो आधारमध्ये अपडेट करायचा आहे.
आता हा फॉर्म सबमिट करावा व ऑथेंटिकेशनसाठी आपले बॉयोमेट्रिक्स द्यावे लागतील.
त्यानंतर तुम्हाला एक स्लिप दिली जाईल, या स्लिपमध्ये एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) दिलेला असेल.
URN च्या माध्यमातून तुम्ही आधारशी मोबाइल नंबर अपडेट स्टेट्स ट्रॅक करू शकता.