Birth and Death Registrations Rule : आपल्यापैकी अनेकांना जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेबद्दल माहीत असते. पण नवीन अपडेट्स असे आले आहेत की आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार क्रमांकाची काहीच आवश्यकता नाही. बऱ्याच लोकांनी या प्रक्रियेसाठी आधार नंबर गरजेचा असण्यावर आक्षेप घेतला होता. आता आधार क्रमांकाच्या शिवाय देखील जन्म आणि मृत्यूची नोंदणी केली जाऊ शकते.
रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) यांनी स्पष्ट केले आहे की, जन्म आणि मृत्यू नोंदणीसाठी आधार नंबर देणे अनिवार्य नाही. आरजीआय ही माहिती एका आरटीआयच्या उत्तरात दिली आहे. आरटीआयच्या उत्तरादाखल आलेल्या आरजीआयच्या पत्रकानुसार जर एखादा स्वत:च्या इच्छेने आधार नंबर देत असेल तरी आधारची प्रिंट आउट काढू नये तसेच जन्म-मृत्यू डाटाबेसमध्ये आधार नंबर स्टोर करू नये.
या पत्रकात म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत आधार नंबर डाटाबेसमध्ये स्टोर केला जाणार नाही तसेच कोणत्याही कागदपत्रावर प्रिंट केला जाईल. जर आवश्यकता भासली तर आधार नंबरमधील पहिल्या चार अंकांची प्रिंट काढली जाऊ शकते.
आंध्र प्रदेशमधील ॲडव्होकेट एम.व्ही.एस. अनिल कुमार राजागिरी यांनी याबाबत आरटीआय दाखल करून सरकारला विचारले होते की, जन्म- मृत्यू नोंदणीकरणासाठी आधार आवश्यक आहे की नाही? या आरटीआयच्या उत्तरादाखल आरजीआय यांनी एप्रिल 2019 मध्ये एक पत्रक जारी करून स्पष्ट केले की, जन्म व मृत्यू नाव नोंदणीसाठी आधांर नंबर अनिवार्य नाही.
या पत्रकामध्ये गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, देशात जन्म तथा मृत्यू नोंदणीकरण रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स एंड डेथ्स (आरबीडी) ॲक्ट, 1969 च्या नियमानुसार केले जाते. आरबीडी ॲक्टमध्ये व्यक्तिच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी व्यक्तिच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्डची गरज असल्याचा कोणताही उल्लेख नाही.
जन्म-मृत्यू नोंद आवश्यक -
देशभरात कोठेही मुलाचे जन्म झाल्यास किंवा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास, याची नोंद जन्म-मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात करणे आवश्यक आहे. खेड्यातील ग्राम पंचायत कार्यालयात आणि आपले घर शहरी भागात असल्यास, नगरपालिका, नगर परिषद किंवा महानगपालिकेच्या कार्यालयात नोंदणी करू शकता.
आजही बरेच लोक जन्म-मृत्यू चे प्रमाणपत्र बनविण्याला एवढ्या गांभीर्याने घेत नाही, म्हणून त्यांच्यासाठी हे समजणे आवश्यक आहे की कायद्याने ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, जी वेळीच पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रमाणेच, जन्माचे प्रमाणपत्र तर मुलांच्या भविष्याशी निगडित सर्वकामांमध्ये उपयुक्त आहे. शाळेत दाखला घेताना जन्म प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्याचपद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स बनविताना, पासपोर्ट बनविताना किंवा एखादी विमा पॉलिसी घ्यावयाची असल्यास किंवा इतर शिधापत्रिका किंवा रेशनकार्ड किंवा सोशल सिक्युरिटी कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी जन्म तारीख प्रमाणपत्राचा वापर केला जातो. म्हणून आपण जन्म-प्रमाणपत्र आवश्यक आहे.
त्याचपद्धतीने मृत्यूच्या नोंदणीचे देखील फायदे आहेत. यामध्ये सर्वात मोठा फायदा वारसा हक्काविषयी आहे. यामध्ये संपत्तीचे वितरण किंवा हस्तांतरण तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मृत्यूचे प्रमाणपत्र आपल्याकडे आहे. या शिवाय पेंशन, विमा, जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतरच होते.
जन्म-मृत्यू नोंद ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे आणि जन्म किंवा मृत्यूच्या 21 दिवसाच्या आत कुटुंबातील कोणताही सदस्य याची नोंदणी करू शकतो. 21 ते 30 दिवसाच्या आत 2 रुपयांचे विलंब शुल्क द्यावे लागते तर 30 दिवस ते 1 वर्षाच्या आत नोंदणी केल्याने नोटरीकडून पत्र सत्यापित करून जिल्हा सांख्यिकी अधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा नोंदणी अधिकारी किंवा विकास अधिकाऱ्याकडून प्रतिज्ञापत्र सही करून घ्यावे लागते. या नंतर जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळते. म्हणून 21 दिवसाच्या आतच या प्रक्रियेला पूर्ण करावे. जरी घटना कितीही जुनी असो जन्म-मृत्यूच्या नोंदणी अधिनियम 1969 च्या 9 (3 )च्या नुसार नोंद केली जाऊ शकते.
वेग वेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेबसाइट्स वर ही प्रक्रिया ऑनलाईन केली जात आहे. परंतु मुळात नियम सर्वत्र एकसारखेच आहेत आणि आता यासाठी आधार कार्ड बनविण्याची देखील आवश्यकता नाही. मात्र सरकारने म्हटले आहे की, जर कोणी व्यक्ती स्वेच्छेने आधार क्रमांक देतो तर कोणत्याही परिस्थितीत हे खात्री करावे लागेल की आधार कार्डाची प्रिंटआऊट तर घेतलेली नाही आणि जन्म-मृत्यूच्या डेटाबेसमध्ये आधार कार्डाचा क्रमांक नमूद नसावा. कोणत्याही परिस्थितीत आधार क्रमांक डेटाबेसमध्ये संग्रहित केला जाणार नाही, तसेच कोणत्याही दस्तएवजावर प्रिंट केला जाणार नाही. आवश्यक असल्यास आधार क्रमांकाचे पहिले चार अंकच प्रिंट केले जाऊ शकतात. आपल्याला काहीच माहिती नसल्यास आपण आपल्या जवळच्या सीएससी(कॉमन सर्विस सेंटर -जनसुविधा केंद्र)वर जाऊन याची संपूर्ण माहिती घेऊ शकता.