नवी दिल्ली. Aadhaar card update: आधार कार्डमधील माहितीत काही विसंगती असल्यास तुम्हाला वाटेल चूक दुरुस्त करण्यासाठी आधार सेवा केंद्रातच जावे लागेल. मात्र, आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI कार्ड होल्डर धारकांना काही चुका ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा देत आहे. तुम्ही आधार कार्डच्या सेल्फ सर्विस पोर्टलवर नाव, पत्ता, लिंग, जन्मतारीख इद्यादी गोष्टी अपडेट करु शकता. हा मार्ग अतिशय सोपा मार्ग आहे.

आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या दस्तऐवजातील सर्व माहिती पूर्णपणे बरोबर आहे हे खूप महत्वाचे आहे. किंवा तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, लिंग किंवा जन्मतारीख दुरुस्त करायची आहे. त्यामुळे तुम्ही आधार कार्डमध्ये किती वेळा दुरुस्ती करू शकता हे आधीच जाणून घ्या

आधारमध्ये किती वेळा सुधारणा होऊ शकते?

1. नाव : दुरुस्ती फक्त दोनदा केली जाऊ शकते

2. जन्मतारीख : दुरुस्ती फक्त एकदाच करता येते

3. पत्ता : याला कोणतीही मर्यादा नाही, कारण लोक घर बदलल्यानंतर किंवा जागा बदलल्यानंतर ते बदलतात, जे आवश्यक देखील आहे.

    4. लिंग : तुम्ही हे फक्त एकदाच बदलू शकता.

    5. मोबाईल नंबर : यातही कोणतीही मर्यादा नाही, कितीही वेळा दुरुस्ती करता येते.

    6. फोटो : फोटो स्पष्ट नसल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव, तो कितीही वेळा दुरुस्त केला जाऊ शकतो.

    आधार कार्ड - नावात फक्त 2 वेळा दुरुस्ती शक्य

    वास्तविक, UIDAI वेबसाइटनुसार, आधारमध्ये नाव दुरुस्त करण्यासाठी फक्त दोन संधी दिली जातात. पण त्यातही काही अटी आहेत. या अटीशिवाय तुम्ही नाव बदलण्याचा विचार करत असाल तर ते शक्य नाही. यासाठी नाव, आडनावामधील स्पेलिंग चूक किंवा ती काढून टाकून लग्नानंतर नाव बदलायचे असेल तर दुरुस्त करून घेऊ शकते.

    आधार कार्ड - लिंग सुधारणे फक्त एकदाच शक्य

    आधार कार्डमध्ये लिंग किंवा जेंडर दुरुस्तीसाठी संपूर्ण आयुष्यभर फक्त एकच संधी आहे. म्हणूनच पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतरच बदलणे महत्त्वाचे आहे. तसे, यात बहुतेक चुका दिसतात.

    आधार कार्ड - पत्ता दुरुस्त करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही

    जागा बदलल्यानंतर किंवा घर बदलल्यानंतर आधार कार्डमध्ये योग्य पत्ता अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पत्त्याला मर्यादा नाही. तुम्ही ते कितीही वेळा दुरुस्त करू शकता.

    आधारमध्ये नाव, लिंग व जन्मतारीख ऑनलाइन कशी कराल अपडेट?वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

    • सर्वात आधी आधार कार्डची अधिकृत वेबसाईट  https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा
    • होमपेजवरील 'Update Your Aadhaar Card' या टॅबवर क्लिक करा.
    • -नवीन पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने आधार कार्डावरील चुका दुरुस्त करू शकता. पहिली पद्धत म्हणजे फॉर्म डाऊनलोड करून ऑफलाईन पद्धतीने आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं. 
    •  'Fill up 4-Step Online Request' च्या खाली चार स्टेप दिल्या आहे. त्यातील Update Aadhaar Data या ऑप्शनवर क्लिक करा.
    •  नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाल तीन प्रश्न दिसतील... आणि त्यांची उत्तरेही... 
    • 1 -  ज्यांनी आधारला मोबाईल लिंक केला आहे ते  आपले आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करू शकतील. व्यक्ती आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिवस, मोबाईल क्रमांक आणि ईमेल या पोर्टलच्या मदतीनं अपडेट करू शकतात
    • 2) डिटेल्ससाठी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 'click here' वर क्लिक करा
    • 3) अपडेट रिक्वेस्टसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रं ऑनलाईन पाठवायचीत त्यांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मिळेल.
    • यानंतर तुम्हाला 'To submit your update/ correction request online please' च्या समोर  Click Here वर क्लिक करावे लागेल.
    • यानंतर उघडलेल्या 'Aadhaar Self Service Update Portal'वर तुम्ही पोहचाल. येथे तुम्हाला 12 अंकांचा आधार क्रमांक टाकावा लागेल. 
    • टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड (कॅप्चा कोड) टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल
    • हा ओटीपी दिलेल्या विहित बॉक्समध्ये टाका.
    • यानंतर तुम्हाला तुमचे नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी यातील जी माहिती बदलायचीय त्यावर क्लिक करा.
    •  Data Update Request उघडल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
    • सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एका पानावर दिसू शकेल.. त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा.
    • सबमिट केल्यानंतर  Document Upload चा सेक्शन समोर दिसेल. येथे तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करू शकता.
    • येथे तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचे नाव सिलेक्ट करावे लागेल.
    • अशा पद्धतीने तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती बदलू शकता.
    • यानंतर तुम्हाला मोबाईलवरही एक मेसेज मिळेल. या मॅसेजमध्ये असलेल्या URN क्रमांकाने तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक करू शकाल.

    ऑनलाइन अपडेट करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

    आधार कार्डमध्ये प्रत्येक प्रकारच्या अपडेटसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. नाव बदलण्यासाठी तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटीटी (पीओआय) ची स्कॅन कॉपी आवश्यक आहे तसेच जन्म तारखेसाठी जन्मतारीख  प्रूफची स्कॅन कॉपी आवश्यक आहे. जर तुम्ही जेंडर म्हणजे लिंग अपडेट करणार असाल तर मोबाइल/फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून ओटीपी ऑथेंटिकेशन करावे लागेल. जर तुम्ही पत्ता अपडेट करणार असाल तर तुमच्याजवळ प्रूफ ऑफ एड्रेस (पीओए)ची स्कॅन कॉपी पाहिजे. जर तुम्ही केवळ भाषा अपडेट करणार असाल तर तुम्हाला यासाठी कोणतेही कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही.