मुंबई. भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) आज अधिकृतरीत्या “प्रो रेसलिंग लीग (PWL) २०२६” च्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. 2019 नंतर जवळपास सात वर्षांनी ही लीग पुन्हा एकदा भारतीय क्रीडाक्षेत्रात धडाकेबाज पुनरागमन करणार आहे. ही लीग जानेवारी 2026 च्या मध्यात सुरू होणार असून, “आयपीएल”च्या धर्तीवर तिचं नियोजन करण्यात आलं आहे.
कुस्तीला मिळणार नवं व्यासपीठ-
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, भारतातील प्रत्येक अखाड्यात प्रचंड प्रतिभा दडलेली आहे. पण त्या खेळाडूंना जागतिक स्तरावर संधी मिळत नाही. प्रो रेसलिंग लीग त्या प्रतिभेला जागतिक व्यासपीठ देईल. ही लीग “पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल” अंतर्गत राबवली जाणार असून, भारतीय कुस्तीचा चेहरामोहरा बदलण्याचा उद्देश आहे.
महिला कुस्तीपटूंसाठी विशेष संधी-
2026 च्या या आवृत्तीत महिला कुस्तीपटूंसाठी मोठा भर दिला जाणार आहे.“भारतीय महिला कुस्तीपटूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दाखवलेली कामगिरी प्रेरणादायक आहे. आता त्यांना अधिक जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि प्रसिद्धी देणं हे आमचं ध्येय आहे,” असे डब्ल्यूएफआय अध्यक्षांनी सांगितले.
