नवी दिल्ली. भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये यूएईविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. वैभव सूर्यवंशीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम मोडला, ज्याच्या नावावर 29 चेंडूंत शतक झळकावण्याचा विक्रम होता.
वैभव सूर्यवंशीने यूएई ए विरुद्ध फक्त 28 चेंडूंत शतक झळकावले. वैभव सूर्यवंशीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा दाखवला. त्याने 16 चेंडूंत अर्धशतक झळकावले. यानंतर पुढच्या 12 चेंडूंवर त्याने शतक पूर्ण केले.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे फलंदाज
वैभव सूर्यवंशी- 28 चेंडू
जेक फ्रेझर-मॅकगर्क - 29 चेंडू
एबी डिव्हिलियर्स- 31 चेंडू
सकीबुल गनी- 32 चेंडू
ईशान किशन- 33 चेंडू
भारतीय संघाच्या नावावरही नोंदवला गेला जागतिक विक्रम -
भारतीय संघाच्या नावावरही या सामन्यात जागतिक विक्रम नोंदवला गेला. भारतीय संघाने या सामन्यात पाच षटकांत 100 धावा पूर्ण केल्या. हा लिस्ट ए क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाच्या सर्वात वेगवान 100 धावा आहेत. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. न्यूझीलंडने ख्राईस्टचर्चमध्ये सन 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 6.3 षटकांत 100 धावा केल्या होत्या.
लिस्ट A एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 100 धावा करणारे संघ
5 षटके - इंडिया A विरुद्ध UAE, दोहा 2026
6.3 षटके - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, ख्राईस्टचर्च 2015
6.3 षटके - इंडिया A विरुद्ध श्रीलंका A, दांबुला 2026
6.4 षटके - न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, वेलिंग्टन 2015.
