नवी दिल्ली. IND vs AUS 4th T20 Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा T20I सामना गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हल येथे खेळला गेला. भारताने ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी पराभव करून मालिकेत 2-1 अशी अजिंक्य आघाडी घेतली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मिशेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकांत 119 धावांतच गारद झाला. अशाप्रकारे, भारताने चौथा टी-20 सामना 48 धावांनी जिंकला.

IND vs AUS 4th T20 Match: भारताकडून कांगारुंची शिकार 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताची चांगली सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मा सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत दिसला, परंतु २१ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारत 28 धावा काढून अॅडम झंपाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

दरम्यान, अभिषेक बाद झाल्यानंतर शुभमन गिलने संघाच्या डावाची जबाबदारी घेत वेगाने धावा केल्या. शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. दुबेने 18चेंडूत22 धावा केल्या. दुबेला नाथन एलिसने बाद केले.

दुबे नंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आला, पण तोही जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही. सूर्याने 10 चेंडूत 20 धावा केल्या, दोन षटकार मारले आणि नंतर तो स्वस्तात बाद झाला. शुभमन गिल सामन्यात 46 धावांवर बाद झाला त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले.

    झंपाने एकाच षटकात भारताला दोन धक्के दिले -

    या सामन्यात अॅडम झंपाने एकाच षटकात भारतीय संघाला दोन मोठे धक्के दिले. त्याने तिलक वर्माला पाच धावा देऊन आणि जितेश शर्माला तीन धावांवर बाद खेले. वॉशिंग्टन सुंदरलाही फक्त 12 धावा करता आल्या. अर्शदीप खातेही न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी, अक्षर पटेलने काही आक्रमक फटकेबाजी केली आणि 11 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला.

    IND vs AUS 4th T20: सुंदरने कांगारूंचा बँड वाजवला

    वॉशिंग्टन सुंदरने सामना फिरवला व तीन विकेट घेत कांगारूंच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.