स्पोर्ट्स डेस्क, नवी दिल्ली. AUS vs IND 2nd ODI Highlights: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड येथे खेळला गेला. या सामन्यात कांगारू संघाने भारताचा पराभव करत एकदिवसीय मालिका 2-0 अशी जिंकली. अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 264 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, कांगारू संघाने 46.2 षटकांत 8 गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले.
AUS vs IND 2nd ODI: 2008 नंतर पहिल्यांदाच भारताचा अॅडलेडमध्ये एकदिवसीय सामन्यात पराभव-
265 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात (AUS vs IND 2nd ODI) फारशी चांगली झाली नाही. कर्णधार मिचेल मार्श 24 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला, तर ट्रॅव्हिस हेडने 40 चेंडूत 28 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्टने 78 चेंडूत 74 धावा केल्या, ज्यामध्ये 4 चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. मॅथ्यू रेन शॉने 30 चेंडूत 30 धावा केल्या. कूपर कॉनोलीने 61 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्याशिवाय मिच ओवेननेही महत्त्वाचे योगदान दिले. दरम्यान, भारताच्या हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
या सामन्यातील पराभवाने भारतासाठी एक अपमानजनक विक्रम रचला, 2008 नंतर अॅडलेडमध्ये भारताचा हा पहिलाच एकदिवसीय पराभव ठरला.
AUS vs IND 2nd ODI: भारताने 264 धावांचे दिले आव्हान -
भारताची (AUS vs IND 2nd ODI) सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 17 धावांत दोन विकेट गमावल्या. कर्णधार शुभमन गिल 9 धावांवर बाद झाला आणि विराट कोहली एकही धाव न काढता तंबूत परतला. दोघांनाही झेवियर बार्टलेटने बाद केले. त्यानंतर रोहित आणि अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला.
भारताने 29.2 षटकांत 2 गडी गमावून 135 धावा केल्या होत्या. सुरुवातीला संथ खेळणाऱ्या रोहित आणि अय्यर दोघांनीही जलद धावा करण्यास सुरुवात केली. मिशेल स्टार्कच्या चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना रोहित हेझलवूडच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर काही वेळातच अय्यरही पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याची विकेट ॲडम झम्पाने घेतली.
AUS vs IND 2nd ODI: विराट कोहलीने ॲडलेडला म्हटले Goodbye
अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला त्याचे खातेही उघडता आले नाही. चार चेंडू खेळल्यानंतर तो शून्यावर बाद झाला. शून्यावर बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना अॅडलेडमधील प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे अभिवादन केले. कोहलीने हात वर करून प्रेक्षकांचे आभार मानले. या हावभावानंतर, असे मानले जात आहे की अॅडलेडमधील कोहलीची ही शेवटची आंतरराष्ट्रीय खेळी असेल. हे लक्षात घ्यावे की किंग कोहलीने आधीच कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याचबरोबर कोहलीच्या एकदिवसीय निवृत्तीच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.
