नवी दिल्ली. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लहान फॉरमॅट आहे. यामध्ये एका टीमकडे एकूण 20 षटके म्हणजेच 120 चेंडू असतात. या फॉरमॅटने क्रिकेटला बदलून ठेवले आहे. आधी परिस्थिती अशी होती की टी20 मध्ये शतक खूप कठीण होते, परंतु आता सोपे झाले आहे आणि अनेक फलंदाजांनी अनेकदा हा कारनामा करून दाखवला आहे. परंतु टी20 मध्ये तिहेरी शतक अजूनही खूपच जास्त मोठी गोष्ट आहे. मात्र हे सुद्धा आाता साध्य झाले आहे.

दिल्लीच्या स्कूल क्रिकेटमध्ये एका खेळाडूने टी20 सामन्यात 311 धावा ठोकल्या, हे ऐकण्यात खूप विचित्र आणि अशक्य वाटू शकते, परंतु हे सत्य आहे. सोशल मीडियावर या खेळीची जोरदार चर्चा होत आहे.

या मुलाने केला चमत्कार -

खरं तर, दिल्ली शाळा टी20 लीगमध्ये आर्यन शर्मा नावाच्या मुलाने ही खेळी केली आहे. आर्यन सुमेरमल जैन शाळेकडून खेळत होता आणि त्यांने इंद्रप्रस्थ वर्ल्ड स्कूलविरुद्ध अशी खेळी केली की, चेंडू फक्त चौकार आणि षटकारासाठीच जाताना दिसला. पाहता पाहता त्यांच्या खेळीची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. त्यांच्या स्कोअरकार्डचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत. आर्यनने 93 चेंडूंवर 27 चौकार आणि 30 षटकारांच्या मदतीने 311 धावांची खेळी खेळली.

टीमला मिळवून दिला विजय -

त्यांच्या या खेळीच्या जोरावर सुमेरमल जैन पब्लिक स्कूलने 20 षटकांमध्ये दोन गडी गमावून 389 धावा केल्या. या पर्वताएवढ्या स्कोअरसमोर इंद्रप्रस्थ स्कूलची टीम 19.5 षटकांमध्ये 142 धावांवर ढेपाळली आणि सुमेरमल जैन स्कूलने 247 धावांनी सामना आपल्या  खिशात घातला.