जेएनएन, नवी दिल्ली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) कोलकत्यात आज गोवा - महाराष्ट्र यांच्यात सामना झाला. या सामन्यात महाराष्ट्राने गोव्याला 15 धावांनी पराभूत केले आहे. महाराष्ट्राने गोव्यात 162 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, गोव्याला अवघ्या 146 धावा करता आहे.
पृथ्वी शॉ 4 धावा करुन बाद
कोलकत्या झालेल्या सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र संघाची सुरुवात काहीशी खराब राहिली. सलामीला आलेला कर्णधार पृथ्वी शॉ हा केवळ 4 धावा करु शकला. त्यानंतर कुलकर्णी, साहिल, यश नाहर यांनांही चांगली खेळी करता आली नाही.
Rahul Tripathi राहुल तिपाठीने संभाळली कमान
गोव्यापुढे ठासळत असलेल्या संघाची कमान ही राहुल तिपाठीने संभाळली. त्याने नाबाद 83 धावांनी सर्वोच्च खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघ चांगल्या स्थिती गेला. आणि गोव्यासमोर 162 धावांचे आव्हान उभे करु शकला.
गोलंदाजांचा दिसला दबदबा
गोव्याकडून ललित यादव याने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. तर महाराष्ट्राच्या जलज सक्सेना (3/22), तनय संघवी (3/23) आणि विकी ओस्तवाल (3/27 यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे महाराष्ट्राला विजय सुकर झाला.
