नवी दिल्ली. Liam Livingstone: अबू धाबी नाईट रायडर्सकडून खेळणारा इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर लियाम लिव्हिंगस्टोनने ILT20 2025 हंगामाच्या दुसऱ्या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. त्याने सामन्यात 82 धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने शारजाह वॉरियर्सच्या गोलंदाजांची धुलाई करत 215 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. विशेष म्हणजे RCB ने त्याला IPL 2026 पूर्वी रिलीज केले आहे.
लियाम लिव्हिंगस्टोनने एका षटकात ३३ धावा फटकावल्या-
2025 च्या आयपीएल मेगा लिलावात लियाम लिव्हिंगस्टोनला (Liam Livingstone) आरसीबीने 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु आता त्याला सोडण्यात आले आहे. तो आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात २ कोटी रुपयांच्या बेस प्राईसवर उपलब्ध असेल. त्याच्या सुटकेनंतर, लिव्हिंगस्टोनने पुन्हा एकदा त्याच्या दमदार खेळीने त्याची क्षमता सिद्ध केली.
बॉलीवूड स्टार शाहरुख खानच्या अबू धाबी नाईट रायडर्स (ILT20 2025) कडून खेळताना, लिव्हिंगस्टोनने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर ILT20 2025 सामन्यात शारजाह वॉरियर्सचा गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसच्या एका षटकात पाच षटकार मारले आणि 33 धावा कुटल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.
त्याने 38 चेंडूत 82 धावा फटकावल्या आणि अबू धाबी नाईट रायडर्सने शारजाह वॉरियर्सचा 39 धावांनी पराभव केला. लिव्हिंगस्टोनच्या स्फोटक फलंदाजीमुळे संघाला 233/4 धावा करता आल्या, जी ILT20 इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
इतकेच नाही तर त्याने एकाच षटकात 33 धावा फटकावल्या, ज्यामध्ये पाच षटकार आणि एक दुहेरी धाव होती. त्या षटकात संघाला वाईडवरून एक धाव मिळाली. आता, आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी (Liam Livingstone ipl auction), त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
When ADKR needed a push, Livingstone gave them a launch 🚀
— FanCode (@FanCode) December 3, 2025
Last over. Total carnage 💥#ILT20 pic.twitter.com/1uSMj6esUB
