नवी दिल्ली. Mohammed Siraj Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत विंडीज संघाला अडचणीत आणले.  बातमी लिहीपर्यंत सिराजने 11 षटकांत 34 धावा देत चार विकेट्स घेतल्या आहेत. तीन विकेट्स घेताच सिराजच्या नावावर एक खास विक्रमही प्रस्थापित झाला आहे.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, सिराज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025) मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्याने आतापर्यंत WTC 2025 मध्ये एकूण 30 विकेट घेतल्या आहेत. या काळात सिराजने मिचेल स्टार्कला मागे टाकले आहे.

मोहम्मद सिराजने एक मोठा टप्पा गाठला

 वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांच्या विरोधात गेला. वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj WTC Record) ने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर टेगनारिन चंद्रपॉलला शून्यावर बाद केले.

चंद्रपॉलने चेंडू लेग साईडकडे खेळण्याचा प्रयत्न केला, पण यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने एक शानदार झेल घेतला. त्यानंतर ब्रँडन किंगने सिराजच्या चेंडूवर चौकार मारला, पण पुढच्याच षटकात सिराजने किंगचा मधला स्टंप उखडून टाकला.

त्यानंतर, पुढच्याच चेंडूवर, सिराजने 12 धावांवर खेळणाऱ्या अ‍ॅलिक अथानाझे याला स्लिपमध्ये केएल राहुलकडून झेलबाद केले. 12 षटकांच्या अखेरीस, वेस्ट इंडिजची धावसंख्या 42/4 अशी केविलवाणी झाली होती, सिराजने तीन आणि जसप्रीत बुमराहने एक बळी घेतला.

    2025 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाराे गोलंदाज

    मोहम्मद सिराज: 30

    मिचेल स्टार्क: 29

    नॅथन लायन: 24

    शमार जोसेफ: 22

    जोश टोंग: 21

    या वर्षी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर आहे, झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझारबानीनंतर, ज्याने 36 बळी घेतले आहेत.