नवी दिल्ली. संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, नंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नमन धीरच्या वादळी खेळीमुळे भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-20 मध्ये चार विकेट्सने हरवले. न्यूझीलंडने आधी फलंदाजी करताना भारताला 226 धावांचे लक्ष्य दिले होते, जे टीम इंडियाने 19.4 षटकांत प्राप्त केले.
ख्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी- 20 सामन्यात न्यूझीलंडने ठेवलेल्या 226 धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मानं टीम इंडियाला धडाकेबाज सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी पॉवर प्लेमध्ये अवघ्या 35 चेंडूत 93 धावांची भागीदारी केली. पण अभिषेक शर्मा 12 चेंडूत २९ धावा करून तंबूत परतल्यानंतर 7 धावांत टीम इंडियाने संजू सॅमनसह 67 (33), तिलक वर्मा 6 (11) आणि ईशान 1 (3) यांच्या पटापट विकेट गमावल्या. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. त्यानंतक कर्णधार श्रेयस अय्यर आणि नमन धीर जोडीने भारताचा डाव सावरला.
122 धावांत टीम इंडियाने 4 विकेट्स गमावल्या होत्या. अक्षर पटेल 14 चेंडूंत 24 धावा करत मोलाचे योगदान दिले. त्यानंतर नमन धीरच्या साथीने श्रेयसने 22 चेंडूंत 43 धावांची भागीदारी करत सामना भारताच्या बाजूनं झुकवला.तो 28 चेंडूंत 42 धावा करून बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात नमन धीरनं षटकार ठोकत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. नमन धीरनं 15 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावांची वादळी खेळी साकारली व संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
न्यूझीलंडने बनवल्या होत्या 225 धावा याआधी न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सच्या वादळी अर्धशतकाच्या मदतीने भारताला 226 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला आधी फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. फिन ॲलन आणि टिम सायफर्टने संघाला शानदार सुरुवात करून दिली होती.
ॲलन आणि सायफर्टने पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. ॲलनने 24 चेंडूंमध्ये 45 धावांची खेळी केली. तिथेच सायफर्टने 24 धावांचे योगदान दिले. याशिवाय, डॅरिल मिचेलने 19 चेंडूंमध्ये 28 धावा बनवल्या.
चार क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फिलिप्सने संघासाठी शानदार खेळी केली. फिलिप्सने केवळ 27 चेंडूंमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने चौथ्या विकेटसाठी बेव्हन जॅकोब्ससोबत 32 चेंडूंमध्ये 73 धावांची भागीदारी केली.
जॅकोब्सने तीन षटकारांच्या मदतीने 16 चेंडूंमध्ये 31 धावा बनवल्या. फिलिप्सने 40 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा ठोकल्य, ज्याच्यामुळे न्यूझीलंडने 20 षटकांनंतर चार विकेट्सच्या नुकसानावर 225 धावा बनवल्या. भारताच्या बाजूने अर्शदीप सिंग, मयंक यादव आणि अक्षर पटेलला एक-एक यश मिळाले.
