नवी दिल्ली. India vs Australia 2nd T20I Highlights: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाच  टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. भारताने फक्त 125 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने 14 व्या षटकात 6 गडी गमावत 126 धावांचे लक्ष्य गाठले. जोश हेझलवूडने भेदक गोलंदाजी करत 3 विकेट घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. अभिषेक शर्माची 68 धावांची खेळी व्यर्थ गेली.भारताकडून केवळ अभिषेक शर्माने चांगली खेळी केली. इतर फलंदाजांकडून त्याला साथ मिळाली नाही. 

हर्षित राणाने 35 धावा केल्या, पण शेवटी अभिषेक एकटाच राहिला. भारताकडून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. मालिकेतील तिसरा सामना रविवार, 2 नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे खेळला जाईल. दोन सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलिया मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे, पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

ऑस्ट्रेलियाने मेलबर्न टी20 सामना चार विकेट्सने जिंकला आहे. भारताला केवळ 125 धावा करता आल्या.  जर भारताने आणखी 30  धावा केल्या असत्या तर सामना रंगतदार झाला असता.  कारण ऑस्ट्रेलियाही शेवटी अडखळला. अभिषेक शर्माने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले, त्याने फक्त 23 चेंडूत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने अर्थशतक पूर्ण केले. 

भारताचा डाव

भारताकडून अभिषेक शर्माने 37 चेंडूत 68 धावा केल्या. हर्षित राणाने 35 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आली नाही. उर्वरित नऊ पैकी चार फलंदाजांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने तीन, तर झेवियर बार्टलेट आणि नाथन एलिसने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. स्टोइनिसने एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचा डाव

    126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मिशेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाला वादळी सुरुवात करून केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 51 धावा जोडल्या. ही भागीदारी धोकादायक बनत असताना वरुण चक्रवर्तीने हेडला बाद करून भारतला सामन्यात परत आणले. हेडने 15 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. तर मार्शचे अर्धशतक थोडक्यात हुकले. 26 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 46 धावा काढून तो बाद झाला. जोश इंग्लिसने 20 धावा केल्या. तर टिम डेव्हिडला फक्त एक धाव करता आली.

    बुमराहची हॅटट्रिक हुकली -

    सामन्याच्या शेवटी बुमराहची जादू दिसून आली. ऑस्ट्रेलियन डावाच्या 13 व्या षटकात बुमराहची हॅटट्रिक हुकली. त्याने षटकाच्या चौथ्या चेंडूवर मिशेल ओवेनला यष्टीरक्षक सॅमसनकरवी झेलबाद केले. तो फक्त 14 धावा करू शकला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने मॅथ्यू शॉर्टचा शानदार यॉर्करवर त्रिफळा उडवला. शॉर्टला खातेही उघडता आले नाही. तथापि, स्टोइनिसने सहा धावांची नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. बुमराह व्यतिरिक्त, वरुण आणि कुलदीपने भारताकडून प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

    ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट गेल्या मात्र सामना तोपर्यंत भारताच्या हातातून निसटला होता.