मुंबई. Mumbai cricket association : मुंबई क्रिकेट संघटनेच्या (MCA) निवडणुकीभोवती निर्माण झालेला गोंधळ आता न्यायालयीन वळणावर पोहोचला आहे. निवडणूक प्रक्रियेतील काही तक्रारी आणि आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर ही बाब थेट मुंबई उच्च न्यायालयात गेली असून, त्यावर आज निर्णायक सुनावणी होणार आहे. या सुनावणीवरच पुढील निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य ठरणार आहे.
पात्र उमेदवारांची यादी होल्डवर-
माहितीनुसार, एमसीए निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृती आणि छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, काही उमेदवारांच्या पात्रतेबाबत वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवरच उच्च न्यायालयाने प्राथमिक सुनावणीवेळी “तोपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करू नये” असे अंतरिम आदेश दिले आहेत. यामुळे निवडणुकीची प्रक्रिया सध्या थांबली आहे.
वादाचे मूळ कारण काय?
माहितीनुसार, काही पदांसाठी उमेदवार पात्रतेच्या निकषांनुसार पात्र आहेत का, या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात आली होती. तसेच काही सदस्यत्व आणि मतदार यादीतील विसंगतींबाबत देखील आक्षेप नोंदवले गेले होते.
याच कारणामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
