स्पोर्ट्स डेस्क, नवी दिल्ली. Asia Cup 2025: आशिया कप 2025 ची उलटगणती सुरू झाली आहे. 9 सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल आणि अंतिम सामना 28 तारखेला खेळवला जाईल. यावेळी 8 संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होईल. सर्व संघांना 4-4 च्या 2 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. आशिया कप 2025 टी-20 स्वरूपात खेळवला जाईल.

'मेन इन ब्लू' हा आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. 16 पैकी 8 विजेतेपदे भारताच्या नावावर आहेत. तर श्रीलंकेने 6, आणि पाकिस्तानने 2 वेळा आशिया कपची ट्रॉफी उचलली आहे.

दोन्ही गट खालीलप्रमाणे आहेत:

  • गट अ: भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान.
  • गट ब: श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग.

आशिया कपमध्ये भारताचे वेळापत्रक:

  • 10 सप्टेंबर: भारत विरुद्ध यूएई
  • 14 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 19 सप्टेंबर: भारत विरुद्ध ओमान

आशिया कप 2025 चे वेळापत्रक:

  • 9 सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
  • 10 सप्टेंबर: भारत विरुद्ध यूएई
  • 11 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
  • 12 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध ओमान
  • 13 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
  • 14 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 15 सप्टेंबर: यूएई विरुद्ध ओमान
  • 15 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
  • 16 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
  • 17 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध यूएई
  • 18 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
  • 19 सप्टेंबर: भारत विरुद्ध ओमान

सुपर फोरचे वेळापत्रक:

    • 20 सप्टेंबर: B1 विरुद्ध B2
    • 21 सप्टेंबर: A1 विरुद्ध A2 (संभाव्य भारत विरुद्ध पाक)
    • 23 सप्टेंबर: A2 विरुद्ध B1
    • 24 सप्टेंबर: A1 विरुद्ध B2
    • 25 सप्टेंबर: A2 विरुद्ध B2
    • 26 सप्टेंबर: A1 विरुद्ध B1
    • 28 सप्टेंबर: अंतिम सामना

    भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग. राखीव खेळाडू: प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, रियान पराग आणि यशस्वी जयस्वाल.

    पाकिस्तान संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सईम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकिम.