जेएनएन, मुंबई: कार्तिक कृष्ण द्वादशीच्या पावन दिवशी आज वसुबारस (Vasubaras 2025 ) साजरा झाला. देशभरातील भक्तांनी गाईमातेचे गोधन पूजन करून घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो, अशी प्रार्थना केली. हा दिवाळी सणाचा पहिला दिवस मानला जातो.
वसुबारस शब्दाचा अर्थ “वसु” म्हणजे धन आणि “बारस” म्हणजे द्वादशी, असा होतो. लोकांच्या श्रद्धेनुसार गाई हे लक्ष्मीचे रूप असून तिच्या पूजनाने घरात समृद्धी वास करते, असा समज आहे. विशेषतः ग्रामीण भागात शेतकरी आपल्या गाईला सजवून तिचे पूजन करतात.
मुंबईसह शहरांमध्येही गाईमातेच्या पूजनासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. महिलांनी स्नानानंतर गाईस फुले, कुंकू व हळद लावून पूजन केले. मंदिरांमध्ये व समाजमंडळांमध्ये विशेष पूजा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सणाच्या पारंपरिक वातावरणात गाईभोवती भक्तांनी प्रदक्षिणा घालत “गौमाता प्रसन्न हो” अशी प्रार्थना केली. सोशल मीडियावरही वसुबारसच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला.
- गाईमातेचे पूजन करून दिवाळीचा शुभारंभ करूया,
धन, धान्य, सुख आणि समृद्धीने घर भरून जावो,
अशी वसुबारसच्या मंगल शुभेच्छा!
- दिवाळीची सुरुवात प्रेम आणि पूजनाने
गाईमातेच्या कृपेने घरात सुख, समाधान आणि भरभराट नांदो.
Happy Vasubaras!
- गाईमाता पूजुनी वसुबारस साजरी,
घराघरात वसे आनंद गोजिरी,
लक्ष्मी येऊ दे घरात तुमच्या,
भरभराटीची दिवाळी करो तुम्हाला नम्र शुभेच्छा!
- या वसुबारशीच्या पावन दिवशी,
गाईमातेच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबात आरोग्य,
आनंद आणि समृद्धी नांदो.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
- गोधन पूजन, लक्ष्मी पूजन,
समृद्धीचा सण वसुबारस!
आपणास आणि आपल्या परिवारास
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा: Dhantrayodashi 2025: धनत्रयोदशीला घरी हे रोप लावल्याने मिलेल कुबेराचा आशीर्वाद