जेएनएन, मुंबई: हळदी-कुंकू आणि बोरन्हाणाचे पारंपरिक सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, पण यंदा 2026 मध्ये हा उत्सव थोडा वेगळ्या स्वरूपात दिसणार आहे. यंदा मकरसंक्रांतीनंतर येणाऱ्या पौष अमावस्येमुळे हळदी-कुंकूचा मुख्य कालावधी फक्त चार दिवसांचा असणार आहे. यंदा 4 दिवस हळदी कुंकू का ? जाणून घेऊया
यंदा मकरसंक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी 2026 रोजी आहे. या दिवशी हळदी-कुंकूचे कार्यक्रम सुरू होतील. मुख्य कालावधी: 18 जानेवारी 2026 रोजी पौष अमावस्या येत असल्यामुळे 14 ते 17 जानेवारी 2026 या चार दिवसांत हळदी-कुंकूचे कार्यक्रम आयोजित केले जातील. रथसप्तमीपर्यंत (25 जानेवारी 2026) हा सण साजरा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे संक्रांतीनंतर देखील हळदी-कुंकूचे कार्यक्रम आयोजित करता येऊ शकतात. परंतु अमस्येपर्यंतच हा सण आयोजित केला जातो.
विशेष म्हणजे, यंदा 14 ते 17 जानेवारी या चार दिवसांतच मुख्य कार्यक्रम भरपूर होणार आहेत, तर 18 जानेवारी नंतर पौष अमावस्या येण्यामुळे कार्यक्रम थोडेसे कमी प्रमाणात होतील. त्यामुळे घरगुती आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
मकरसंक्रांतीला स्त्रिया एकमेकांना वाण देतात कारण हा सौभाग्य, प्रेम, एकता आणि पारंपरिक शुभतेचा संदेश देणारा सण आहे. हा प्रथा फक्त धार्मिक नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि नातेसंबंध जोपासण्याचा एक मार्ग आहे.
हेही वाचा: Makar Sankranti 2026: खिचडी खाणे आवश्यक आहे की उपवास ठेवणे आवश्यक आहे? जाणून घ्या शास्त्र काय सांगते
