मुंबई. Happy Vasubaras 2025 Wishes In Marathi: दीपावलीच्या मंगल पर्वाची सुरुवात आश्विन कृष्ण द्वादशी अर्थात गोवत्सद्वादशी किंवा वसुबारस या पवित्र तिथीपासून होते. या दिवशी सवत्स गोमातेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसेला लागला जातो. यादिवशी अभ्यंगस्नान करून गाईची पूजा केली जाते. आपल्या गाय वासराला गोठ्यातील बैलांना सजवण्यात येते. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. यंदा वसूबारस 5 नोव्हेंबरला आहे. चला तर मग दिवाळीची सुरुवात करूया वसुबारसेच्या हटके मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून आपल्या प्रियजनांना…

वसुबारस 2026 : खास शुभेच्छा संदेश (Vasu baras 2026 Wishes In Marathi)

01) दिन दिन दिवाळी

गाई म्हशी ओवाळी

गाई म्हशी कोणाच्या

प्रिय बळीराजाच्या

    02) गाई वासराला पुजूया

    संस्कृती आपली जपूया

    वसुबारसेला सर्वांनी

    मिळून दिवाळी साजरी करूया

    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

    03) गाई-वासराच्या पवित्र नात्यासारखा स्नेह तुमच्याही कुटुंबात सदैव राहो

    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला वसुबारस आणि गोवत्स द्वादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

    04) दिवाळीचा पहिला दिवस आणि कृषी संस्कृतीचा हा सुंदर सण!

    तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो

    वसुबारसच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

    05) गोधनाच्या पूजनाने तुमच्या घरात सदैव अन्नधान्य आणि धन-समृद्धीची कृपा राहो

    तुम्हाला वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा!

    06) दिवाळीच्या पहिल्या सणाच्या शुभेच्छा!

    वसुबारसेच्या पवित्र पर्वावर आपल्या जीवनात 

    सुख-समृद्धीचे दीप उजळू देत. 

    आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा!

    07) गोमातेच्या चरणी नतमस्तक!

    गोसेवेचे पुण्य लाभो, संकटे दूर होवोत,

    आपल्या घरात सदैव सुख-शांती नांदो. 

    वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा!

    08) कामधेनूची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

    09) गोमातेचे पूजन

    मातृत्वाचे पूजन

    वसुबारसेचा दिन शुभ

    मंगलमय होवो तुमचा सण

    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...

    10) संस्कृती परंपरा जपूया

    गोमातेचे पूजन औक्षण

    वसुबारसेला करूया

    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा…