जेएनएन, मुंबई. Happy Guru Purnima 2026 Wishes: आपल्या जीवनात गुरुला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. गुरुमुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि आपल्या विविध क्षेत्रात प्राविण्य साध्य करत असतो. कोणत्याही व्यक्तीच्या यशात त्याच्या गुरुचा सर्वात महत्त्वाचा वाटा असतो. अशा आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2026 Date)
दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा (Guru Purnima 2026) उत्सव देशभरात साजरा केला जाईल. आपल्या गुरूला नमन करून त्यांचे आशीर्वाद घ्या. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंना खास शुभेच्छा पाठवून त्यांच्याप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करा.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Guru Purnima 2026 Wishes In Marathi)
- गुरू म्हणजे दीप प्रकाशाचा, अंधार दूर करणारा आशेचा मार्ग
शब्दांनी घडवतो जीवनाचा अर्थ, गुरुपौर्णिमेस मानाचे वंदन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! - ज्ञानाची वाट दाखवणारा, संस्कारांचे बीज पेरणारा
गुरू म्हणजे जीवनाचे सार, तेच खरे ईश्वराचे रूप साकार
गुरुपौर्णिमा 2026 हार्दिक शुभेच्छा! - गुरू तोच खरा देव , सत्य, ज्ञानाचा सदा गुरू
त्याच्या कृपेसमोर सारे लघु, गुरुपौर्णिमा साजरी करुया सारेज
Happy Gurupurnima 2026! - गुरू म्हणजे वाट दाखवणारा, अंधारातही जीवनात उजेड पसरवणारा
जगण्याला अर्थ देणारा, गुरुपौर्णिमा 2026 हार्दिक शुभेच्छा! - गुरूची छाया लाभली जेथे, सुख, शांती, समृद्धी नांदते तेथे
पावलोपावली आशीर्वाद त्यांचा, गुरुपौर्णिमा दिन खास त्यांचा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश; गुरुजनांसाठी खास मेसेज (Guru Purnima Greetings And Quotes)
ज्ञानाचा दीप लावणारे,
अंधारातही योग्य दिशा दाखवणारे,
अपयशाचे यशात रूपांतर करणारे,
आणि जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्गदर्शक ठरणारे…
असे सर्व माझ्या गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू आहेत सर्वांत महान,
शिकवतात शहाणपण, देतात जीवनाला नवा आयाम
ना भेदभाव, ना अपेक्षा
देतात फक्त नि:स्वार्थ प्रेम आणि दिशा
या पावनप्रभात गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू म्हणजे अंधारात प्रकाशाचा किरण,
गुरू म्हणजे वाट चुकल्यावर योग्य मार्गदर्शन,
या पवित्र दिवशी गुरूंना करूया स्नेह अर्पण ,
त्यांच्या कृपाछायेतच होऊ दे सुंदर जीवन
या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना शतशः वंदन!
गुरू म्हणजे दिशा, गुरू म्हणजे गती
त्याच्यामुळेच होते उन्नती
गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी
माझ्या गुरूला माझी मानवंदना
गुरुपौर्णिमा 2025 हार्दिक शुभेच्छा!
गुरु म्हणजे प्रेरणा,
गुरु म्हणजे विश्वास,
गुरु म्हणजे शक्ती!
गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी
सर्व गुरूंना मन:पूर्वक वंदन आणि शुभेच्छा!
अशाप्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंना खास मराठीतून मेसेज, स्टेटस आणि शुभेच्छा संदेश पाठवून कृतज्ञता व्यक्त करु शकता.
