जेएनएन, मुंबई. आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणरायांचा गणेशोत्सव सुरु आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळी आली आहे. यंदा अनंत चतुर्थी ही 25 सप्टेंबर रोजी आहे. गणपती विसर्जन करताना काय करावे आणि काय करू नये या विषयी माहिती घेण्यार आहोत.
गणेश विसर्जन करताना ‘या’ पाच चुका करू नका
- मूर्ती विसर्जित करताना फेकू नका:
बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित करताना ती आदराने आणि हळुवारपणे पाण्यात सोडावी. काही लोक गर्दीमुळे किंवा उत्साहाच्या भरात मूर्ती दुरून पाण्यात फेकतात, ज्यामुळे मूर्ती भंग होऊ शकते. हे अत्यंत अशुभ मानले जाते.
- पाण्यात प्लास्टिक व कचरा टाकू नका:
निर्माल्य (पूजा साहित्य, फुले, हार) प्लास्टिकच्या पिशवीसह पाण्यात फेकू नका. यामुळे जलप्रदूषण होते. निर्माल्यासाठी महापालिकेने ठेवलेल्या विशेष कलशांचा वापर करावा.
- अस्वच्छ ठिकाणी किंवा पायदळी मूर्तीचे अवशेष येऊ देऊ नका:
विसर्जन घाटावर किंवा विसर्जनासाठी नेमूण दिलेल्या ठिकाणीच योग्य पद्धतीने गणेशाचे विसर्जन करावे. अनेकदा मूर्तींचे अवशेष किनाऱ्यावर वाहून येतात. तिथे आपले पाय पडणार नाहीत याची काळजी घ्या. घरी विसर्जन करत असाल तर ते पाणी पायदळी येणार नाही अशा स्वच्छ ठिकाणी किंवा झाडांना घाला.
- विसर्जनानंतर लगेच सजावट काढू नका
गणपती विसर्जन झाल्यानंतर काही जण बाप्पांची स्थापना केलेली जागा लगेच स्वच्छ करून संपूर्ण सजावट काढून टाकतात. धार्मिक मान्यतेनुसार, असे करणे योग्य मानले जात नाही. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गणपतीची स्थापना केलेली जागा स्वच्छ करावी, अशी प्रथा आहे.
- विसर्जनासाठी नेताना बाप्पांचे मुख घराकडे असावे
गणपतीची मूर्ती विसर्जनासाठी नेताना अनेकदा बाप्पांचे मुख घराच्या बाहेरील दिशेला असते. मात्र, धार्मिक मान्यतेनुसार ही पद्धत योग्य मानली जात नाही. गणपतीची मूर्ती घरातून बाहेर नेताना बाप्पांचे मुख घराच्या आतील दिशेला असावे, असे मानले जाते. यामुळे गणपतीचा आशीर्वाद घरावर आणि कुटुंबावर कायम राहतो, अशी श्रद्धा आहे.
गणेश विसर्जनाची योग्य पद्धत (Ganesh Visarjan correct procedure)
- उत्तरपूजा:
गणेश विसर्जनापूर्वी बाप्पाची आरती करून 'उत्तरपूजा' करावी. म्हणजेच मूर्ती आपल्या जागेवरून थोडी हलवावी.
- क्षमा याचना:
पूजेमध्ये किंवा सेवेमध्ये काही चूक झाली असल्यास बाप्पाकडे हात जोडून क्षमा मागावी.
- प्रसाद वितरण:
बाप्पाला मोदक किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा.
गणेश आरती (Ganesh Aarti)
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची
नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुन्दर उटी शेंदु राची
कंठी झलके माल मुकताफळांची
जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामना पूर्ति
जय देव जय देव
रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
हीरे जडित मुकुट शोभतो बरा
रुन्झुनती नूपुरे चरनी घागरिया
जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामना पूर्ति
जय देव जय देव
लम्बोदर पीताम्बर फनिवर वंदना
सरल सोंड वक्रतुंडा त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना
जय देव जय देव, जय मंगल मूर्ति
दर्शनमात्रे मन कामना पूर्ति
जय देव जय देव
आरती पूर्ण झाल्यानंतर गणेशजींकडे घरातील सुख-शांती, समृद्धी आणि सर्व विघ्ने दूर करण्याची प्रार्थना करा. यानंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वितरित करा आणि श्रद्धेने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करा.
अस्वीकरण: या लेखात सांगितलेले उपाय/लाभ/सल्ला आणि विधान केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. दैनिक जागरण येथे या लेख फीचरमध्ये लिहिलेल्या गोष्टींचे समर्थन करत नाही. या लेखात समाविष्ट माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/मान्यता/धर्मग्रंथ/दंतकथांमधून गोळा केली गेली आहे. वाचकांना विनंती आहे की लेखाला अंतिम सत्य अथवा दावा न मानणे आणि आपल्या विवेकाचा उपयोग करणे. दैनिक जागरण अंधश्रद्धेच्या विरोधात आहे.
