मुंबई. Ganesh Chaturthi 2026 wishes in Marathi: गणेश चतुर्थी हिंदू धर्मात खूप पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी घराघरांत लोक गणेशाची स्थापना करतात. 10 दिवस पूजा केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला जातो.
हा केवळ पूजा-अर्चा करण्याचा सण नाही तर आपल्या प्रियजनांसोबत आनंद वाटण्याचा व नात्यात प्रेम वाढवण्याचा सण आहे. यावर्षी गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. या विशेष प्रसंगी लोक आपल्या कुटूंबीयांना, मित्रांना आणि प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतात.
गणेश चतुर्थी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा सण. विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्रीगणेशाच्या आगमनाने घराघरांत आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. या मंगलमय पर्वाच्या निमित्ताने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची परंपरा आहे. गणरायाच्या आगमनाचा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समाधान घेऊन येवो,या गणेशोत्सवानिमित्त आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि आप्तेष्टांना पाठवता येतील अशा काही सुंदर, प्रेमळ आणि पारंपरिक शुभेच्छा संदेशांचा हा संग्रह.
गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश 2026 (Ganesh Chaturthi 2026 Wishes)

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

हार फुलांचा घेऊनी वाहू चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पूजन करुया गणरायाचे
गणपती बाप्पा मोरया!

बाप्पाच्या आगमनाने आनंद फुलो,
घराघरात सुख-शांती नांदो,
मनामनात भक्तीचा गजर होवो,
प्रत्येक दिवस मंगलमय होवो!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

लाडक्या बाप्पाची कृपा राहो,
सुख-समृद्धी घरी नांदो,
प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,
आयुष्य आनंदाने फुलो!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाच्या मंगल आगमनाने,
घर आनंदाने उजळून जावो,
नात्यांमध्ये गोडवा वाढो,
सुखाचा सुगंध दरवळो!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
तुमचे सर्व दु:ख संकटे दूर होवोत
श्री गणपती बाप्पा तुमच्या घरी येवो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!

मोदकांचा प्रसाद ,
लाल फुलांचा हार ,
नटून - थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या काना
इतका विशाल असावा
अडचणी उंदरा इतक्या
लहान असाव्यात
आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लांब असावे आणि आयुष्यातले
क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

विघ्ने सारी दूर जावोत,
सुखाचे क्षण आयुष्यात यावोत.
गणरायाची कृपादृष्टी सदैव राहो,
तुम्हाला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा लाभो!
