नवी दिल्ली. मध्य प्रदेशातील मुरैना येथील नौदंडा गावात, एका तरुणीला तिच्या जनावरांसाठी चारा कापताना विषारी साप चावला. वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी, तिच्या कुटुंबातील सदस्यांनी झाड पाला औषधोपचार करण्याचा मार्ग अवलंबला. तिची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात नेले, जिथे तिचा मृत्यू झाला.
धक्कादायक म्हणजे, विळ्याने गवत कापताना सापही कापला गेला होता व त्याचे तीन तुकडे झाले होते. मात्र सापाचे तोंड असणारा भाग जमिनीवर पडताच, त्याने तरुणीला चावा घेतला.
वडील होरीलाल कुशवाह आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी 18 वर्षीय भारतीला उपचारासाठी झाडपाला औषधोपचार करणाऱ्या डॉक्टरकडे नेले. इतर घरगुती उपचारांचाही प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी, त्यांनी तिला सबलगड रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
