जेएनएन, नवी दिल्ली: आंध्रप्रदेशमध्ये बस जळाल्याची घटना ताजी असतानाच आता राजस्थानमध्येही तशीच एक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी एका भीषण अपघातात बस जळून खाक झाली. जयपूर ग्रामीण भागातील मनोहरपूरजवळ मजुरांना घेऊन जाणारी एक प्रवासी बस हाय-टेन्शन पॉवर लाईनच्या संपर्कात आल्याने बसला आग लागली.

यादरम्यान बसला करंट लागला व या आगीत सुमारे 10 कामगार गंभीर भाजले, त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जयपूर येथे रेफर करण्यात आले आहे.

जयपूरजवळ हाय-टेंशन वायरला धडकली बस - 

रिपोर्टनुसार मजुरांना घेऊन जाणारी बस यूपीमधील मनोहरपूरमधील टोडी येथील वीट भट्टीकडे जात होती. यावेळी रस्त्यातच बसला आग लागली. बस 11 हजार व्होल्टच्या उच्च वाहिनी तारेच्या संपर्कात येताच बसला आग लागली.

दोन मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक होरपळले - 

    अपघाताची माहिती मिळताच मनोहरपूर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव व मदत कार्य सुरू केले. जखमींना शाहपुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले तर गंभीररित्या भाजलेल्या मजुरांना जयपूरला हलवण्यात आले आहे. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पोलिसांनी दोन मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले असून घटनेचा तपासही सुरू केला आहे.

    हे ही वाचा -हैदराबाद-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला धडक दिल्यानंतर बसला आग; 20 जणांचा मृत्यू