जेएनएन, नवी दिल्ली. Radhika Yadav Murder : हरयाणा राज्यातील गुरुग्रामध्ये सेक्टर 57 येथे राष्ट्रीय पातळीवरील टेनिस खेळाडू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनीच गोळ्या घालून हत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. त्याचबरोबर असाही संशय व्यक्त केला जात आहे की, वडिलांनी समाजाच्या टोमण्यांनी त्रस्त होऊन आपल्या मुलीची हत्या केली की, खरं कारण दुसरंच आहे.
ज्या मुलीला मोठ्या लाडाने व कौतुकाने वाढवले व असे संस्कार दिले की, तिने केवळ आपले कुटूंब, वडिलांचे नाही तर गुरुग्राम, हरियाणा तसेच देशात काम कमावले. ज्या कुटूंबाचा आपल्या मुलीचा गर्व वाटत होता मात्र तोच अभिमान समाजाच्या टोमण्यांनी डळमळीत झाला. राधिकाचे शेजारीही या घटनेने शोक व्यक्त करत आहेत.
मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सोशल मीडियावर राधिका यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी शूट करण्यात आला होता. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, हा व्हिडिओ तर राधिकाच्या हत्येचं कारण नाही?
ज्या सेक्टर 57 मधील एका वस्तीत ही धक्कादायक घटना घडली, तेथील लोकांना पोलीस घटनास्थळी येईपर्यंत याची काहीच कल्पना नव्हती. पोलीस गाड्यांच्या सायरनचा आवाज ऐकून लोक घराबाहेर आले.
लोकांनी सांगितले की, कुटूंबातील लोक चांगल्या स्वभावाचे होते. राधिकाही सर्वांशी मनमोकळेपणाने बोलत होती. मात्र लोकांचे त्यांच्या घरात येणे-जाणे कमी होते. लोकांनी सांगितले की, राधिकाच्या वडिलांचा स्वभाव खूपच रागीट होता व क्षुल्लक गोष्टीवरून त्यांच्या रागाचा पारा चढायचा.
सांगितले जात आहे की, अकादमी सुरू करण्यासाठी वडिलांनीच तिला सव्वा कोटी रुपये दिले होते. राधिकाने जमीन भाडे करारावर घेऊन अकादमी सुरू केली.
अकादमीत प्रशिक्षण घेणारे खेळाडू काय म्हणाले?
राधिका यादव घराजवळच सेक्टर 57 मध्ये आपल्या अकादमीत मुला-मुलींना टेनिस शिकवत होती. दीड महिन्याआधीच तिने अकादमी सुरू केली होती. यामध्ये जवळपास ५० खेळाडू प्रशिक्षण घेत होते. या घटनेनंतर काही खेळाडू तिच्या घरी गेले. त्यांनी म्हटले की, या घटनेने त्यांना धक्का बसला आहे. त्यांना अकादमीत दाखल होऊन आता काही दिवसच झाले होते. राधिका खूपच तन्मयतेने त्यांचे प्रॅक्टिस घेत होती. तिने कधीत घरातील वादाचा उल्लेख कोणासोबत केला नव्हता.
मर्डरचे व्हिडिओ कनेक्शन -
राधिका यादवने एक वर्षापूर्वी म्यूजिशियन इनामुल सोबत एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये लव्ह स्टोरी दाखवली होती. राधिकाच्या हत्येनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओचा संबंध काही लोक तिच्या हत्येशी जोडत आहेत. मागील वर्षी जून महिन्यात शूट केलेल्या या व्हिडिओला जिशान अहमद यानेप्रोड्यूस केले होते. हा व्हिडिओ इनाम नावाच्या यूट्यूब चॅनलवर व्हायरल केला होता.
राधिकाचे वडील दिपक यांना हा व्हिडिओ आवडला नव्हता व त्यांनी राधिकाला सोशल मीडियावरून तो काढून टाकण्यास सांगितलं होतं. परंतु सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने ते मान्य केलं नाही. यामुळे दीपक आणखी संतापले.